₹100.00
आपल्या मुलांशी बोलत असताना, तसंचत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना, आजहीपालकांची गाडी एका विशिष्ट, नाजूक पणमहत्त्वाच्या मुद्दयाला अडते – लैंगिकतेच्या.म्हणजे या बाबतीत बोलायला हवं, हे त्यांनाहीजाणवत असतं; पण अडचण असते ती ‘कायसांगू’, ‘कसं सांगू!’ याची. त्याचवेळीयाबाबत कोणाशी बोलावं, हेही कळत नाही.हे जाणूनच, गेली पंचवीसहून अधिक वर्षंलैंगिकता शिक्षणाबाबत काम करणा-या साठेपतिपत्नींनी मोकळेपणानं, पण संकोचजाणवणार नाही अशा सहज भाषेत साधलेलाहा संवाद, ‘आजच्या’ पालकांच्या मनामधीलअनेक संदेह दूर करेल आणि पालकत्वाच्यात्यांच्या या वाटचालीत त्यांना निश्चितचमार्गदर्शक ठरेल. केवळ ‘आई’नंच नव्हे, तर‘बाबा’नंही वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक!