Lokdhunantun Ragnirmitee – लोकधुनांतून रागनिर्मिती

SKU: 14341
Publisher:
Our Price

130.00

Product Highlights

लोकधुनेत जी स्वरावली आहे, जे स्वरसंवाद आहेत, ते musically genuine असले; तर रागात प्रमाण होतात. लोकसंगीतात केवळ रागनिर्मितीचीच बीजे आहेत,
असे नसून त्यांत शक्यताच शक्यता बीजरूपाने किंवा रोपट्याच्या रूपाने अस्तित्वात आहेत, त्या रोपांचा बगिचा करायला हवा. लोकसंगीत सहज आहे, तर रागसंगीताला बौद्धिक आधार आहे; भावना-संवेदना दोन्हीकडे आहेत. लोकधुनेची काही अंशी व्याख्या करणारे आणि कलासंस्कृतीत तिची भूमिका दाखवून देणारे लिखाण सौ. साधना शिलेदारांच्या हातून घडले आहे.
निर्मितीचे एक-एक टप्पे समजून घेऊन त्या प्रक्रियेला मान्यता देऊन त्याप्रमाणे रागनिर्मितीचा रीतसर प्रयत्न कुमारजींनंतर सर्वप्रथम साधना शिलेदार यांनी केलेला आहे.
पं. मुकुल शिवपुत्र

Quantity:
in stock
Category: