KANCHANMRUG – कांचनमृग

SKU: 11419
Publisher:
Our Price

100.00

Product Highlights

‘श्री’ मिळवायची झाली, तर वेडीवाकडी वळणं घेतल्याखेरीज ती हाती येत नाही. पण आज ‘श्री’चं वेडंवाकडं वळण तेवढंच लक्षात ठेवलं जातं. ‘श्री’च्या वळणातलं सामथ्र्य नेमकं विसरलं जातं. वेडीवाकडी वळणं घेतच नदी जाते. पण तिची वळणं भूभाग अधिक समृद्ध करायला कारणीभूत ठरतात. वेडीवाकडी वळणं घेत दयाखोयांचा रस्ता जातो. म्हणूनच माणसाला सहजतेनं संकटांचे डोेंगर तरता येतात. आज ‘श्री’चं नेमकं सामथ्र्य हरवून वेडीवाकडी वळणं तेवढीच कवटाळली जातात! कष्ट, सेवा हे शब्द फक्त उच्चारण्यापुरते उरलेत. सामथ्र्याच्या पायाखाली ‘त्याग’ चिरडला जात आहे. जीवनमूल्यांचा हा हास माणसाला कुठवर पोहोचवणार आहे ?

Quantity:
in stock
Category: