₹180.00
“कथांतर हा एक प्रवास आहे – काही एक दुरावा दूर करण्याचा. आणि प्रयासही – अशाचा, की या ‘दुराव्या’मध्येही काही भक्कम ‘दुवा’ आहे, हे दाखवून देण्याचा. आजोबा आणि शेजारचा लहानगा मुलगा यांचं जगावेगळं प्रेम, आजीशी पैजा लावणारा छोटासा नातू, साहेबांच्या भीतीनं थरथरणारा कारकून, शाळेतील शिक्षकांना विसरून जाणारे विद्यार्थी, खरेदीसाठी नवर्याचा छळ करणारी ‘अधर्मचारिणी’, पुस्तकवेडी माणसं- मराठी माणसाला नवीन का आहेत? ‘आंधळा पाऊस’ मधील माणसाच्या मृत्यूनंतरचा सावळा गोंधळ पाहिला, की ‘‘मी जाता राहिल कार्य काय?’’ हा आपल्या भा. रा. तांब्यांचा प्रश्न आठवत नाही का? एका ‘बाल’ विद्यार्थ्याकडून ‘‘वर्गातील पाठ कसा असावा?’’ याचा पाठ जेव्हा शिक्षिकेला मिळतो, तेव्हा ‘शिष्यात इच्छेत पराजयम ॥’ या भारतीय ‘आदर्शा’विषयी तिला सांगावंसं वाटतंच वाटतं. तेव्हा हे ‘अंतर’- हे केवळ भौगोलिक सीमांतर आहे. माणसं सारी इथून तिथून सारखीच. हे समजून जर वाचकांनी या कथा ‘आपल्या’ केल्या, तर ‘प्रवास’ आणि ‘प्रयास’ दोहोंचाही शीण गोड होऊन जाईल. “