₹495.00
इंग्रजांच्या विरोधात पंजाबात १९०७मध्ये घडून आलेली ‘पगडी संभाल जट्टा` चळवळ आणि १९१४मधील गदर उत्थान चळवळ यामुळे इंग्रज सरकारने सुरू केलेली दडपशाही… त्यामुळे पेटून उठलेली पंजाबी जनता… ब्रिटिशांनी लागू केलेला रौलट कायदा, ज्यानुसार सरकारने राज्यकत्र्यांना मनमानी कामकाज करण्याचा दिलेला परवाना… त्याची परिणती म्हणून १३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत बैसाखी निमित्त जमलेल्या शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार… या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद… या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ… मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या शपथेच्या मार्गाने सुरू राहिलेली त्याची वाटचाल… या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन… एका स्वातंत्र्यवीराची धगधगती कहाणी