₹300.00
इंडियन एअरलाईन्सच्या काठमांडू ते नवी दिल्ली फ्लाईट आय्. सी. च्या सुमारे २०० प्रवाशांच्या आणि विमानातील कर्मचाNयांच्या दृष्टीने तो एक नरकाचा प्रवास होता… बंदिवासातील त्या आठ दिवसांमध्ये त्यांच्यांतील प्रत्येकाने नानाविध मानवी भावभावनांचा भयभीषण अनुभव घेतला. आपल्या परीने असाच अनुभव त्यांच्या अपहरणकत्र्यांनी घेतला. त्या बुरखाधारी अपहरणकत्र्यांनी स्वत:ची नावे चीफ, बर्गर, डॉक्टर, शंकर आणि भोला अशी घेतली होती. या पुस्तकामध्ये त्या संपूर्ण अपहरणनाट्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. यातील एकेक अनुभव रसरशीत, जिवंत होऊन आपल्यापुढे उभा राहतो. त्या १७३ तासांतील तो मानसिक ताण, ती दहशत आपल्याला वेगळ्याच भयावह जगात घेऊन जाते. मग ते काठमांडू असो, नाहीतर अमृतसर, दुबई असो, की वंÂदाहार! नवी दिल्ली येथील, सत्तावेंÂद्रे आणि अर्थात विमानांच्या अंतर्भागाचाही या अपहरणनाट्यात समावेश आहे. अपहरणाची ती संपूर्ण धाडसी योजना आखण्यापासून ते ती पूर्णपणे पार पडेपर्यंतचे सर्व दुवे एकसूत्राने गुंफण्यात आले आहेत… — आणि अखेर अपहरणकर्ते पाकिस्तानात जाऊन कसे भूमिगत होतात, त्याचेही दर्शन या पुस्तकातून घडवण्यात आले आहे.