LALITKALECHYA SAHAWASAT – ललितकलेच्या सहवासात

SKU: 11319
Publisher:
Our Price

250.00

Product Highlights

‘ललितकलेच्या सहवात’ हे पुस्तक पुरुषोत्तम श्रीपत काळे (‘वपुं’चे वडील) यांनी विसाव्या दशकाच्या पूर्वार्धात (४०-५० दशकात) लिहिले आहे. ते स्वत: चित्रकार होते. केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळीत ते पडदे रंगविणे, नैपथ्यरचना अशी कामे करीत. चित्रकार असूनही शब्दांवर आणि एवूÂणच लेखनकलेवर त्यांची हुकमत होती, हे पानोपानी जाणवते. सुमारे ऐंशी वर्षांहून अगोदरच्या काळात मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. शब्दोच्चार आणि लेखनही अनुनासिक होते. अशा काळात लिहिलेले असूनही त्यांची शब्दरचना लालित्यपूर्ण आहेच, शिवाय आशयघन आणि वास्तवदर्शी आहे. हा ‘ललितकलादर्श’चा छोटेखानी इतिहासच म्हणता येईल.

Quantity:
in stock
Category: