₹495.00
हॅरी पॉटरचं हॉगवटस जादू आणि तंत्र विद्यालयातलं पाचवं वर्ष सुरू होणार आहे. बहुतेकशा विद्याथ्र्यांना येते, तशी हॅरीला उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीच मजा येत नाही, ही गोष्ट खरी असली, तरी ही सुट्टी नेहमीपेक्षा जास्त वाईट गेली. डस्र्ली कुटुंबीय त्याच्या आयुष्याचा नरक करून टाकत होते. फार काय, त्याचे खास खास मित्र रॉन आणि हर्माइनीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. हॅरीला आता सगळं सहन करण्याच्या पलीकडचं वाटत होतं. या सगळ्या वातावरणात बदल करण्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होता, पण तेवढ्यातच त्याची उन्हाळ्याची सुट्टी नाट्यमय रीतीनं अकस्मात संपलीदेखील. हॉगवटर्सच्या पाचव्या वर्षी हॅरीला जे काही कळलं, त्यानं त्याचं संपूर्ण जगच बदललं… रहस्य आणि रोमांचानं ओतप्रोत भरलेली जबरदस्त नवी कादंबरी. जे. के. रोिंलगच्या लेखणीत कमालीची जादू आहे. ‘रोिंलगच्या कल्पनाशक्तीची धाडसी झेप विलक्षण आहे.’ – द टाइम्स ‘सात वर्षाच्या जितक्या मुलांना मी ओळखतो, ते सगळे जण हे द ऑर्डर ऑफ फिनिक्स नावाचं गलेलठ्ठ पुस्तक वाचण्यासाठी जीव टाकतायत.’ – डेली मेल