₹180.00
आधुनिक युगातील जीवनशैलीमुळे माणसासमोर जी आव्हाने उभी राहिली आहेत त्यामध्ये मधुमेहाचे आव्हान गंभीर आहे; एवढेच नव्हे तर जगात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. ‘मधुमेह : एक आव्हान’ यामध्ये मधुमेहाचा परिचय करून देत असता या आजाराला जबाबदार घातघटक आणि आजाराची लक्षणे याचे विवेचन केले आहे. मधुमेहावर अद्याप परिणामकारक उपाय सापडला नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार, औषधोपचार आणि व्यायाम यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पुस्तकात त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आजार उग्र न होण्यासाठी प्रतिबंधक उपाय सुचवले आहेत, त्याचबरोबर मधुमेहाचे दुष्परिणाम यावर विवरण आहे. यातील परिशिष्टे आजार नियंत्रण प्रभावीपणे कसे करायचे याकरता उपयुक्त आहेत. डॉ. अरुणा जैन आणि डॉ. अशोक बिरबल-जैन हे वर्धा येथील मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण केंद्र यांचे संचालक आहेत.