₹400.00
११ सप्टेंबर, २००१ रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात. त्या पैकी दोन विमाने वल्र्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींना धडक देतात आणि त्या कोसळतात हे जगभर प्रसारित झालेले दृश्य कोणीच विसरू शकत नाही. तीन एक हजार निरपराध लोक जीव गमावतात. त्या वेळेपासून दहशतवाद हा शब्द उच्चारताच प्रथम एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, ओसामा बिन लादेन! हा इतका कट्टर दहशतवादी बनला कसा हे कळणे अवघड होते; कारण अत्यंत धनाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण आता त्याला ओळखणारे त्याच्या कुटुंबामधले कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तोंड उघडायलाच तयार नव्हते. आणि मग खरे तर आश्चर्यच घडले, ओसामाची पहिली पत्नी नज्वा आणि त्यांचा चौथा मुलगा ओमर यांनी बोलण्याची तयारी दर्शवली. कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच ग्रोर्इंग अप बिन लादेन!