₹240.00
२००५च्या मे महिन्यामध्ये बेथ हॉलोवेला तिची मुलगी नॅटली तिच्या हायस्कुल सीनियर क्लासच्या ट्रीपला गेलेली असताना अरूबा बेटावरून बेपत्ता झाल्याचा भयानक फोन आला. ह्या घटनेला चार वर्षे झाल्यानंतर बेथने तिच्या मुलीच्या बेपत्ता होण्याची ही कथा आणि हृदय पिळवटून टाकणारा तिचा तो कसोटीचा काळ, तसेच ज्या अतूट विश्वासाच्या जोरावर तिने ह्या परिस्थितीशी झुंज दिली, त्याबद्दल जगाला सांगायचे ठरविले. मुलीच्या शोधासाठी बेथने पूर्णपणे समर्पित स्वयंसेवकांच्या ताफ्यासह अथक परिश्रम घेतले. तरीही यातील अनेक प्रश्न अनुत्तरित होते आणि अजूनही आहेत. घटनेच्या या कथनातून भ्रष्ट राजकारणाचे जे दर्शन घडते, त्यामुळे ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’ ह्याच वचनाचा प्रत्यय येतो. एका आईच्या हिमतीची, ताकदीची, समर्पणाची आणि अढळ प्रेमाची ही प्रेरणादायी सत्यकथा आहे!