₹250.00
शाहच्या इराणमध्ये, श्रीमंत, पाश्चात्याळलेल्या उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेली सुझान अगदी संपन्नतेत वाढली. तिच्या विशेष वर्तुळामुळे, येणाऱ्या क्रांतीच्या पडघमांकडे दुर्लक्ष होणं अगदी साहजिक होतं. मग शाहचा पाडाव झाला. मग अयातुल्लाह खोमेनीच्या दडपणाऱ्या, नव्या मूलतत्त्ववादी राजवटीत सुझान आणि तिच्या मित्रमंडळींवर `ताघौती` – सैतानाचे अनुयायी – असा शिक्का बसला. लोक त्यांच्या मागावर राहिले. त्यांच्या मुलांचा बुद्धिभेद केला गेला. त्यांची मालमत्ता जप्त झाली. पतीच्या मृत्यूनंतर, मुलाबरोबर एकटी राहत असलेली सुझान हे फारच `सोपं` सावज होतं. तिला उचलून तुरुंगात टाकलं गेलं. तिथे तिनं `उठवळ वागणं` आणि `असभ्यपणा` यांच्या नावाखाली विलक्षण छळवाद सोसला. एका मुल्लाची नजर तिच्यावर पडल्यानंतर त्यानं सुटकेच्या बदल्यात स्पष्टपणे शरीरसुखाची अपेक्षा व्यक्त केली. नंतर तिची सुटका झाली. पण खरं स्वातंत्र्य हिमाच्छादित झाग्रोस पर्वताच्या पलीकडे तुर्कस्तानात होतं. जिथे पोहोचण्याचा मार्ग एक स्त्री व तिच्या लहानग्यासाठी अत्यंत खडतर होता. धर्मवेड्या, युद्धभग्न इराणमधील एका स्त्रीचा जगण्यासाठीचा धीरोदात्त लढा, `इराणमधून सुटका` वाचकांना खिळवून, गुंतवून टाकतो.