₹300.00
मी माझे डोळे मिटून घेते. आणि माझ्या लहानपणीच्या दु:स्वप्नांना पिटाळून लावून; मला शांत करणारा माझ्या आईच्या हाताचा माझ्या कपाळावर होणारा स्पर्श आठवू पाहते. स्वतंत्र्यवृत्तीची आणि बंडखोर अशी सायरा आपल्या सुंदर आणि आज्ञाधारक बहिणीबरोबर – अमिनाबरोबर, कॅलिफोर्नियात वाढली आहे. लहानपणापासून तिने आपली स्वातंत्र्याची इच्छा आणि आपल्या कुटुंबाच्या परंपरा यांना विभागणारी सीमारेषा ओलांडली आहे. विशेषत: मुंबईत वाढलेल्या तिच्या आईच्या मनात आपल्या मुलीने कसं वागावं याच्या ज्या कल्पना होत्या; त्या साऱ्या तिने मोडीत काढल्या होत्या. नवे-नवे अनुभव घेण्यासाठी आतूर असलेली आणि जगाबद्दल अपार कुतूहल असलेली सायरा एका लग्नाला हजर राहण्यासाठी कराचीला जाते आणि तिथे तिच्या कुटुंबातील काही रहस्यं तिच्यापुढे अचानक उभी ठाकतात – ती रहस्यं ज्यांनी तिच्या पुढच्या आयुष्याला एक वेगळाच आकार दिला. मागच्या तीन पिढ्यांना समजून घेण्याचा आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याचा जो सायराचा प्रवास होता; त्याची ही सुरुवात होती. सायराच्या लक्षात येतं की, प्रेमासाठीची, काहीतरी मिळवण्याची आपल्या इच्छांची परिपूर्ती करण्याची जी लढाई ती लढत होती, तीच लढाई तिच्या आधीच्या पिढीतील व्यक्तींनीही लढली होती आणि म्हणूनच तिला मिळालेला बहुआयामी वारसा तिने जपून ठेवला पाहिजे.