₹160.00
‘‘योग ही काही आत्महत्या नाही. योग ही एक अतिशय गहन अशी प्रक्रिया आहे, एक कला आहे. आणि तुम्ही तर एकएक पाऊल चालत राहिलात तर सारं काही तुमच्या आतच लपलेलं आहे. तुम्ही सगळं घेऊनच आला आहात. फक्त ते प्रगट करायचं बाकी आहे. तुम्ही अप्रगट परमात्मा आहात फक्त थोडं प्रगट व्हायचं आहे. वाद्य तयार आहे, बोटं थोडी तयार करायची आहेत— मग वीणेचे स्वर निनादू लागतील. जसजशी बोटं तयार होऊ लागतील तसतसं अधिकाधिक सखोल संगीत निर्माण होईल. आणि मग एक क्षण असा येईल जेव्हा वीणेचीही गरज उरणार नाही, बोटांचीही गरज उरणार नाही— तेव्हा चारी दिशांना अस्तित्वात असलेलं परम संगीत ऐकू येऊ लागतं— फक्त तुमच्याजवळ ऐकण्याची क्षमता हवी आहे… त्या नादालाच आपण ‘ओंकार’ म्हणतो.“