₹110.00
वर्षानुवर्षे म्हातारीच असलेली माणसे आपण पाहतो, तसाच पारावरचा निंब आहे. त्याला तरणा कोणी पाहिला असेल का, याची मला शंका आहे. प्रचंड बुंधा असलेला आणि गुरवाच्या म्हातारीप्रमाणे अंगावर लहान-लहान आवाळे असलेला निंब आपला आहे तसा आहे. निंबाचे म्हातारपण एका विशिष्ट जागी येऊन थांबलेच आहे. चैत्रमासात पुन्हा चमत्कार होतो. म्हाताऱ्या निंबात पोपटी रंगाची पालवी चहू अंगांनी उसळ्या घेऊ लागते. तिच्या रूपाचा अगदी उजेड पडतो. उन्हात तगमग होऊ लागली की, पारावर येऊन बसावे – वाळ्याचे पडदे चोहो बाजूंना सोडले आहेत, असे वाटते.