₹250.00
यशोधरा. मोठ्या शहरात राहणारी एक तापट डोक्याची मुलगी. तुलनेने लहान शहरात वाढलेल्या पारंपरिक कुटुंबात वाढलेल्या विजय नावाच्या एका मुलाशी तिची गाठ बांधली जाते. एका शब्दात सांगायचं तर संकटच उद्भवतं. ते दोघं वैवाहिक जीवनाशी आणि एकमेकांशी जुळवून घ्यायला शिकण्याचा प्रयत्न करतात. मग तो यशोधराचा लहरीपणा असो की विजयचा वाटेल तसं बकण्याचा स्वभाव असो. आपापल्या स्वभावलकबीनुसार वागणारे झरीना, विनोद, त्यांची वात्रट मैत्रीण ‘विवि’आणि अर्थात त्या दोघांची कुटुंबं यांची मदत त्या दोघांना होतेच. अनुष्का ऊर्फ पिनट बाळाच्या अनपेक्षित आगमनामुळे दोघांच्यातला झगडा वाढतो. बाळाला कसं वाढवायचं. यासंबंधीच्या दोघांच्या मतभेदामुळं त्यात तेल ओतलं जातं. त्यांच्या प्रणयराधनाच्या सुरुवातीच्या काळात प्रिय वाटणारे त्यांच्यातले मतभेद शेवटी इतके विकोपाला जातात की ते दोघं एकमेकांना अनुरूप नाहीतच, असं वाटावं. त्यांचं एखाद्या तरी मुद्द्यावर एकमत होईल का, की ती एक आवाक्याबाहेरची गोष्ट ठरेल? लग्न आणि पालकत्व याविषयीचा आधुनिक आणि प्रामाणिक विचार असलेली, स्वत्त्वाचा शोध घेणारी ही एक कथा आहे. ती तुम्हाला खळखळून हसवेल आणि त्यातल्या विनोदी वाटणाऱ्या व्यक्तिरेखा तुम्हाला आकर्षित करतील.