₹195.00
आयलंड आफ द ब्लू डॅल्फिन ही 1960ची बालसाहित्यातली प्रथितयश कादंबरी. जॅना मारिया या अठरा वर्षिय मुलीच्या अचाट धाडसाची ही सत्यकथा. कादंबरीत ती कराना या नावाने आपल्याला भेटते. कादंबरीची नायिका कराना. तिचा भाऊ रॅमो. रॅमोची चिकित्सक वृत्ती कायम नव्या आव्हानांना तोंड देत असते. कराना आणि तिचं कुटुंब या बेटावर सुखासिन रहात असतं. पण एक दिवस एक रशियन व्यापारी जहाज बेटाला भेट देत. या जहाजासोबत झालेल्या संघर्षात करानाचं कुटुंब उध्वस्त होतं. निरनिराळ्या आपत्तींमुळं कराना बेटावर एकटी पडते. तिथून तिचा जीवनसंघर्ष सुरु होतो. या जीवसंघर्षाची थरारक जाणीव या पुस्तकातून अनुभवाला येते. बेटावर एकटी रहात असतानाही कराना धैर्य सोडत नाही. उलट आत्मविश्वास आणि धैर्याच्या जोरावर ती एकटी उभी रहाते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अखंड प्रयत्न करत रहाते. कादंबरीत करानाचा हा संघर्ष सकारात्मकतेचा संदेश भरुन टाकतो. बेटावर आयुष्याचे नवे अर्थ शोधताना कराना निसर्गाच्या नजीक जाते. तिचं जगणं निसर्गातल्या मुलभूत गोष्टींवर अवलंबून होतं. करानाचं हे निरामय निसर्गजीवन आधुनिकतावादापुढेही प्रश्नचिन्ह निर्माण करतं.