MELTDOWN – मेल्टडाउन

SKU: 10709
Publisher:
Our Price

300.00

Product Highlights

तुमच्या देखत तुमचं जग कोलमडून पडत असताना तुम्ही पळणार तरी कुठे? सॅम्युएल स्पेन्डलव्ह फार घातक खेळ खेळत आहे. बर्टनच्या साम्राज्याशी टक्कर घेतलेल्या दलालाची, त्या गूढ व्यक्तिमत्त्वाच्या खानची गुप्तपणे माहिती मिळवण्याचं काम प्रसारमाध्यमाच्या अनभिषिक्त सम्राटासाठी करण्याचं त्याने मान्य केलं होतं, कारण बर्टनला खानचा सूड घ्यायचा होता. हे काम त्याला पॅरिसच्या शेअर बाजारातून करायचं होतं. सुरुवातीला तिथलं तणावग्रस्त वातावरण सॅम्युएलला भावलं नाही, पण नंतर तो रुळला आणि त्याला ते आवडायला लागलं. काही काळ सगळं सुरळीत चाललेलं होतं. पण प्रसंगी ऐकमेकाचे गळेसुद्धा कापणाऱ्या या आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारातल्या धसमुसळ्या वातावरणात काहीच गृहीत धरून चालत नाही. जेव्हा त्याची आकर्षक सहकारी, गूढरीत्या अचानक नाहीशी होते, तेव्हा त्याचं जग एक एक तुकड्यानी कोलमडायला लागतं. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोसळायला लागली, तेव्हा त्यासाठी सॅम्युएलला जबाबदार ठरवण्यात आलं आणि मग सगळेच त्याच्या मागे लागले – शत्रू, सहकारी आणि अर्थातच पोलीसही! लपण्यासाठी जेव्हा त्याने पॅरिसच्या अंडरवल्र्डमध्ये आसरा घेतला, तेव्हा तिथे कल्पनेपेक्षाही भयानक प्रकार चालत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने सुरुवातीला जो खेळ मांडला होता, त्याचे नियम आता पार बदलले होते. त्याचं जग कोलमडून पडायच्या आधी त्याला सत्य समजणार होतं का? कारण एक गोष्ट अटळ होती, . . . . . . .

Quantity:
in stock
Category: