₹495.00
‘जॉर्जेस सिक्रेट की टू द युनिव्हर्स’ हे पुस्तक म्हणजे जॉर्ज या शाळकरी मुलाच्या अपूर्व धाडसाची आणि त्याच्या हुशारीची कथा आहे. जॉर्जच्या शेजारी एरिक नावाचे वैज्ञानिक राहायला येतात. त्यांची लहान मुलगी अॅनी आणि कॉसमॉस हा त्यांचा सुपर कॉम्प्युटर यांच्यासह ते राहत असतात. जॉर्जची एरिक आणि अॅनीशी घनिष्ठ मैत्री होते. ‘कॉसमॉस’मुळे अंतराळात जाणं एरिक आणि अॅनी यांना अगदी सहजसाध्य असतं. अॅनी एरिकच्या चोरून एकदा जॉर्जलाही अंतराळाची सफर घडवते. जॉर्जच्या शाळेतील एक शिक्षक डॉ. रीपर एरिकच्या विरोधात असतात. एरिकची दिशाभूल करून ते एरिकना अंतराळात पाठवतात आणि कॉसमॉसला चोरून नेतात. एरिकचा जीव धोक्यात आहे, हे जॉर्जला समजतं. तो एरिकना वाचवण्यासाठी काय करतो? डॉ. रीपर आणि एरिकमध्ये कोणत्या कारणामुळे शत्रुत्व असतं? जॉर्ज रीपरकडून कॉसमॉसला कसा हस्तगत करतो…याची उत्कंठापूर्ण कहाणी.