₹220.00
“सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते.“ — कबीर जे अज्ञानी आहेत तेच मृत्यूला घाबरतात. ज्यांनी मृत्यू ओळखला आहे, त्यांनी जीवन जिंकले आहे. मृत्यूसारखी परम सुंदर गोष्टच नाही या जगात. जर तुमची सावली नष्ट करायची असेल तर तुम्ही एका जागी स्थिर होता, सावली आपोआप नाहीशी होते. जसे प्रत्येक समस्येकडे डोळे उघडून पहाता, समस्या आपोआप संपून जाते. मृत्यूचेही तसेच आहे. मृत्यूपासून पळायचा प्रयत्न केलात तर तो पाठलाग करेल. पण त्याकडे निर्भयपणे पहाल तर तो अमृतासमान भासेल. थांबा आणि मृत्यूला सामोरे जा. मृत्यू ओळखायला शिका. तुम्हाला परमेश्वर भेटेल. कबिरांच्या सुंदर दोह्यांमधून ओशो जीवनाचा नवा अर्थ शोधू पाहतात. ओशोंच्या रसाळ भाषेतले हे अर्थ वाचून कदाचित आपल्यालाही जीवन समजेल.