₹120.00
हे छोटंस फूल पटकन खुडून घे, विलंब करू नकोस! अन्यथा ते कोमेजून जमिनीवर धुळीत पडेल, अशी मला भीती वाटते. त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही तरी चालेल; पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणाऱ्या वेदनेने बहुमानितकर आणि खुडून घे. मी सावध होण्याआधी बघताबघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल, अशी मला भीती वाटते. ह्या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला, तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे. वेळेतच त्याला खुडून घे.