₹200.00
आजच्या समकालीन वृतपत्रांच्या मथळ्यांसारखे, काळाचे बंधन नसलेल्या प्रेम आणि द्वेष ह्या भावनांसारखे… घराण्याचा मान आणि इभ्रतीसाठी तिला ठार मारायला निघालेल्या भावाच्या तावडीतून सुटून एक तरुण मुलगी इंग्लंडच्या आश्रयाला येते. जेव्हा सल्मा लग्नाआधी गरोदर राहते, त्या वेळी लेव्हांटमधील तिच्या त्या छोट्याशा खेड्यातील तिचं निव्र्याज आयुष्य, ओढ्यात पोहणं सारं कायमचं संपतं. तिच्या संरक्षणासाठी तिला तुरुंगात टाकलं जातं. ती किंचाळत असताना तिची नवीन जन्मलेली मुलगी तिच्यापासून हिरावून घेतली जाते. इंग्लिश शहरांच्या मध्यभागी असलेल्या एक्स्टर ह्या भागात ती येते. आपल्या घरमालकिणीकडून ती वागण्याबोलण्याच्या रितीभाती शिकते आणि नंतर एका इंग्लिश माणसाशी लग्न करून स्थिरस्थावर होते; परंतु तिच्या हृदयात खोलवर तिच्या छोट्या मुलीचं रडणं अजूनही घुमत असतं. जेव्हा हे सर्व सहन करणं तिला अशक्य होतं, तेव्हा ती तिला शोधण्यासाठी आपल्या खेड्यात परत जाते. हा प्रवास सर्वच बदलून टाकील… की काहीही होणार नाही. लेव्हांटच्या ऑलिव्हच्या झाडीतून आणि एक्स्टरमधील पावसानं भिजलेल्या फरसबंदीवरील एकूण हा प्रवास… पुढे येणा-या अनुल्लंघनीय अशा अडथळ्यांशी झुंजणा-या स्त्रीच्या असामान्य धैर्याचं ‘माय नेम इज सल्मा’ हे ज्वलंत शब्दचित्र आहे.