MY DAUGHTER MY MOTHER – माय डॉटर माय मदर

SKU: 10493
Publisher:
Our Price

495.00

Product Highlights

“१९८४ साली एका शिशु खेळगटात दोन आया एकमेकींना भेटतात. त्यांची मैत्री वाढत जाते आणि त्या आपलं आयुष्य एकमेकींसोबत वाटून घेतात– अगदी सगळ्या रहस्यांसकट. जोआन – गोड, लाजरी मुलगी जिला दिवसेंदिवस स्वत:च्या नवऱ्याची भीती वाटते आहे. तिने ज्याच्यावर प्रेम करून लग्न केलं तो देखणा, हसतमुख तरुण हिंसक, विरोधात जाणारा का होतो आहे; हे तिला उमजेनासं झालं होतं. हे इतर कुणालाही सांगायची तिला लाज वाटत होती. जोआनची आई – मार्गारेट –हिला अचानक हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. तेव्हा प्रथमच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे कळलं की, आपल्या आईच्या आयुष्यात असं बरंच काही घडून गेलंय, ज्याची आपल्याला सुतराम कल्पना नाही. मार्गारेटला युद्धकाळात सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं होतं आणि तिने आपलं उभं आयुष्य त्या आठवणी गाडून टाकण्यात घालवलं. सुकी – जिने एका लग्नाचा भयाण अनुभव घेतला असून, सध्या स्वत:च्या माहेरी राहते आहे. अशा रीतीने ‘बदनाम’ होणं सोपं नव्हतं. तिच्या आईने – मीनीने – तिच्याबरोबर अबोला धरला आहे. सुरुवातीला हा अबोला सुकीला न केलेल्या गुन्ह्याची अन्याय्य शिक्षा वाटत होता. पण हळूहळू तिला कळत गेलं की, तिच्या आईच्या मनात खूप विचित्र गुंतागुंत आहे. हा अबोला फक्त वरवरचा आहे आणि तिच्या आईला तिची – तिच्या मुलीची – नितांत गरज आहे. ही गोष्ट आहे दोन अस्वस्थ, तरुण मुलींची ज्यांना अपघातानेच आपापल्या आयांच्या आयुष्यातील हृदयद्रावक सत्यं समजतात. आई मुलीला कसं घडवते आणि मुलीकडून जगणं कसं शिकते, याची सुंदर गोष्ट! भूतकाळात अडकलेल्या आया आणि वर्तमानाला आव्हान देऊन भविष्य घडवू पाहणाऱ्या त्यांच्या तरुण मुलींची कहाणी! “

Quantity:
in stock
Category: