NATH HA MAZA – नाथ हा माझा

SKU: 10348
Publisher:
Our Price

395.00

Product Highlights

नाथ हा माझा हे व्यक्तिचरित्राच्या धाटणीत लिहिलं गेलेलं विलक्षण आत्मकथन आहे. एका डॉक्टरचं वैद्यकीय पेशाला बगल देत सिनेमाच्या रूपेरी पडद्याला आपलंसं करणं आणि त्यासाठीचा त्याचा संघर्ष यांचं पारदर्शी चित्रण कांचन घाणेकर यांनी मांडलं आहे. तीस वर्षीय डॉ.काशिनाथ घाणेकर आणि त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेली पंधरा वर्षीय कांचन यांची ही प्रीतीगाथा आहे. कांचन आणि डॉ. घाणेकर यांच्यात दोन दशकं फुललेल्या प्रेमाच्या अंकुराची ही गोष्ट बहुआयामी स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि तथाकथित चौकटीबाहेरच्या नात्यांबाबतची सामाजिक मानसिकता यावरही प्रकाश टाकते.एका नायकाच्या जडणघडणीचा काळ ते उतरणीचा काळ, त्यातली घालमेल, तडफड यांचं हृदयस्पर्शी चित्रण यात अनुभवायला मिळतं. डॉ. घाणेकर यांचं हे चरित्र मराठी सिनेसृष्टीलाही प्रेरणादायी ठरलं. या पुस्तकावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून 2018 सालचा हा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.

Quantity:
in stock
Category: