₹140.00
चारू, आदित्य आणि शशांक हे आपापल्या जागी एका विशिष्ट परिस्थितीत सापडले आहेत. त्या परिस्थितीत त्यांचा मानसिक कोंडमारा होतो आहे. या कोंडमायातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना त्यांच्या जवळच्याच व्यक्तीच्या सहवासात सापडतो. हा मार्ग आपल्याला नक्की कुठे नेणार आहे, याचं भान येण्याआधीच त्यांनी या मार्गावर चालायला सुरुवात केलेली असते. त्यांच्या या, त्यांच्या स्वभावधर्मानुसार पुढे जाणाया वाटचालीचे टप्पे टागोर या कथानकांमधून चित्रित करतात. त्यांच्या स्वभावधर्मानुसार ही कथानकेही वेगवेगळी होतात आणि त्यांचे शेवटही वेगवेगळे होतात. टागोरांचा या विषयाचा शोध चालूच राहतो.