₹200.00
‘फिश ! टेल्स’ अर्थात ‘फिश! कथा’ हा प्रेरणादायी कथांचा संग्रह आहे. पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेऊन मेरी जेनने आपल्या मरगळलेल्या विभागात कसं चैतन्य आणलं, ही कथा ‘फिश’मध्ये आहे. तर ‘फिश टेल’मध्ये पाइक प्लेस फिश मार्केटपासून प्रेरणा घेतल्यामुळे स्प्रिंट ग्लोबल कनेक्शन सव्र्हिसेस, युनिव्हर्सल फोर्ड टोयोटा, एक हॉस्पिटल आणि अन्य व्यक्तींनी घेतलेली प्रेरणा आणि त्या प्रेरणेमुळे त्या व्यक्तींमध्ये आणि संस्थांमध्ये घडलेले सकारात्मक बदल याच्या कथा आहेत. स्टिफन सी. लन्डिन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल हे तिघं फिश मार्केटमधील उत्साही वातावरणाने प्रभावित झाले. त्या वातावरणातून जाणवलेली चार तत्त्वं (चैतन्यपूर्ण सहभाग, सौख्याची अनुभूती, तन्मयता, समरसता) त्यांनी एका फिल्म डॉक्युमेंटरीद्वारे मांडली. त्यांच्या परिभाषेत ‘फिश फिलॉसॉफी’ असं नाव दिलं. त्यानंतर ही चार तत्त्वं अधोरेखित करणारी फिश फिलॉसॉफी त्यांनी ‘फिश’ नावाच्या पुस्तकातून कथारूपात मांडली. त्यामुळे ही फिलॉसॉफी जगभर पोहोचली. ज्यांनी या फिलॉसॉफीचा अवलंब केला, त्यांच्यात एक व्यक्ती म्हणून आणि संस्थेचे कर्मचारी म्हणूनही सकारात्मक बदल झाला आणि त्या सकारात्मकतेचं सु-फलित त्यांच्या पदरात पडलं. तर ज्यांना ही फिलॉसॉफी यशदायी, फलदायी ठरली त्यांनी आपले अनुभव या पुस्तकाच्या लेखकांना कळवले आणि त्या अनुभवांचं संकलन ‘‘फिश! कथा’मध्ये करण्यात आलं आहे. फिश फिलॉसॉफीमुळे एका कॉल सेंटरचं वातावरण कसं चैतन्यमय झालं आणि केवळ या फिलॉसॉफीमुळे ते एक वृद्धेचा जीव कसा वाचवू शकले, याच फिलॉसॉफीमुळे एका टोयोटा कंपनीतील वातावरण कसं चांगलं झालं आणि एका ल्युकेमिया झालेल्या माणसाच्या पत्नीला त्यांनी कशी मानवतावादी वागणूक दिली, तसेच हीच फिलॉसॉफी एका हॉस्पिटलमधील वातावरण प्रसन्न करण्यास कशी कारणीभूत ठरली आणि त्यामुळे मृत्यूच्या जवळ असणाऱ्या रुग्णांनाही कसा आनंद मिळाला, हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘फिश! कथा’ वाचलंच पाहिजे.