₹300.00
मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली, नव्हे, गाडलेली ही गोष्ट आपल्या मुलींना, नातवंडांना कशी सांगायची? ही गोष्ट साधीसुधी नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजिरवाणी, दुर्दैवी भोगवटा होता. असा भोगवटा ज्याचं दु:ख, अपमान, लाज इतक्या प्रदीर्घ काळानंतरही तब्बल पन्नास वर्षांनंतरही यात्किंचितही कमी झालेली नाही. एक दिवस आपलं मन त्यांच्याजवळ मोकळं करावंच लागणार आहे, त्याची जाणीव मला होतीच पण मी कुठल्या तोंडानं त्यांना हे सांगणार होते.. ‘‘मग ठरवलं, ते सगळं आपण लिहून काढायचं, कागदावर उतरवायचं.’’ आयुष्याचं अर्धशतक– थोडीथोडकी नव्हे, पन्नास वर्षं जॅननं मनात धुमसत राहिलेला कोंडमारा सहन केला. पण १९९२ साली या कोंडमा-यांचा उद्रेक झाला. ऐन तारुण्यात जॅनला जो शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला त्याचं हृदयद्रावक कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. ‘सुखदायिनी’ हे गोड बिरुद ज्या स्त्रियांना लावण्यात आलं ते एखाद्या इंगळीप्रमाणे त्यांना जन्मभर डसत राहिलं पण त्यांना तोंडातून वेदनेचा हुंकार काढण्याचीही सोय नव्हती. कारण मृत्यूची टांगती तलवार तर त्यांच्या डोक्यावर होतीच शिवाय घरादाराची अब्रू वेशीवर टांगली जाईल ही भीतीही होती. लैंगिक अत्याचारांमुळे जो अपमान, जे दु:ख तिला सोसावं लागलं त्याची ही कहाणी.