LENINGRADACHA VEDHA – लेनिनग्राडचा वेढा

SKU: 10269
Publisher:
Our Price

320.00

Product Highlights

८ सप्टेंबर, १९४१. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणा-या हिटलरच्या फौजांनी सोव्हिएत महासंघाचा मानबिंदू असणा-या लेनिनग्राड शहराभोवती पक्का फास आवळला. यामागे होती, एक थंड डोक्यानं आखलेली क्रूर योजना आणि लोकांची उपासमार करून शहर नष्ट करण्याची निर्दयी नाझी विचारसरणी. सलग ८७२ दिवस पडलेला हा वेढा, हे मानवी इतिहासातलं एक भीषण पर्व आहे. विनाशासाठी टपलेलं शत्रूसैन्य आणि अत्यंत भ्रष्टाचारी नेत्यांची गलथान हुकूमशाही यांच्यात भरडले जाऊन, दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक भुकेनं तडफडून मेले. नैतिक अध:पतनाचं टोक गाठलं गेल्यानं नरमांसभक्षणासारखे अघोरी प्रकार घडले. पण लेनिनग्राडच्या काही नागरिकांनी आपल्यातलं माणूसपण मरू दिलं नाही आणि अखेर त्यांनी विजय मिळविला. लेनिनग्राडचा वेढा ही त्या विलक्षण झुंजीची, मन सुन्न करणारी कहाणी आहे.

Quantity:
in stock