₹495.00
‘महात्मा गांधीं आणि त्यांचा भारतीय संघर्ष’ (ग्रेट सोल महात्मा गांधी) हे पुस्तक गांधींच्या जीवनाचा सर्वांगीण वेध घेतं. गांधींनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने, सामाजिक मूल्यांचे त्यांना आलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान परक्या उपखंडात (दक्षिण आफ्रिकेत त्यांनी घालविलेल्या दोन दशकांत) कसे फुलले, पोसले गेले आणि त्यांना ‘महात्मा’ म्हणून डोक्यावर घेणाऱ्या भारताने त्यांची तत्त्वं कशी पायदळी तुडवली, याचे वर्णन या पुस्तकात आहे. महात्मा गांधी एक प्रतिाQष्ठत वकील, जो राजकीय आणि सामाजिक कृति-कार्यक्रमांना स्वत:ला वाहून घेताना पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा होतो याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते. या नेत्याने दीर्घ काळापासून उभारलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान शेवटी भारताच्या विभाजनात, पाकिस्तानच्या निर्मितीत कसे झाले आणि जातिसंहाराच्या रक्तपाताने डागाळलेला हा प्रवास अखेरीस त्यांच्या स्वत:च्या हत्येपाशी जाऊन कसा थांबला, याचे वर्णनही या पुस्तकात आहे.