₹190.00
जो बदल तुम्हाला या जगात पाहायला आवडेल, तो बदल तुम्ही स्वत:त घडवला पाहिजे! `मी काय करु शकतो? मी तर सामान्य माणूस!` अशा प्रकारचे उद्गार गांधीजींनी कधीच काढले नाहीत; ते नेहमी म्हणत, `हळुवारपणानेही तुम्ही जग बदलू शकता!` आणि त्यांनी तसे केले. आपल्या विचाराने आणि कृतीने गांधीजींनी लाखो भारतीयांना प्रेरित केले आणि एका सामथ्र्यशाली साम्राज्याला स्वत:च्या स्वप्नापुढे झुकायला भाग पाडले. `स्वतंत्र भारत` या एकाच स्वप्नाने त्यांना असामान्य बनविले, लाखो भारतीयांचा अद्वितीय नेता बनविले. त्यांच्या पश्चात इतक्या दशकांनंतर आजही त्यांचे विचार आणि कार्य तितकेच प्रेरणादायी आहे. गांधीजींच्या आयुष्यात घडलेल्या ज्या प्रसंगांनी त्यांचे जीवन घडवले, अशा प्रसंगांचे व त्यावरील गांधीजींच्या विचारांचे एकत्रिकरण या पुस्तकात केलेले आहे. या पुस्तकाला श्री. अनुपम खेर यांची प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक वाचून आपणही थोडंसं शिकू या!