₹120.00
आजच्या शिक्षण पद्धतीत वाचणे, लिहिणे आणि अंकगणित यांबरोबर विद्याथ्र्याने सामान्य विज्ञानातही प्रावीण्य मिळवायला हवे, अशी नवी विचारधारा वाहू लागली आहे. हे सामान्य विज्ञान शिकवण्याहून त्याचे सहज सोपे प्रत्यक्ष प्रयोग विद्याथ्र्याकडून करवून घेतले, तर त्यांना ते लवकर आत्मसात करता येते, हाही एक प्रत्यक्षानुभूत निष्कर्ष. श्री. डी. एस्. इटोकर यांनी विद्याथ्र्यांना विनासायास अगदी सहज उपलब्ध होेतील, अशा वस्तूंतून, चिंतनातून आणि कृतीने सामान्य विज्ञानातील निवडक सिद्धान्तांच्या मूलतत्त्वांना प्रायोगिक रूप दिले आहे. वैयक्तिक व सामूहिक रीत्या हे प्रयोग करून पाहिल्यास विद्याथ्र्याचा बौद्धिक स्तर उंचावण्यास नि:संशयपणे होईल.