EKAKI BAND – एकाकी बंड

SKU: 10105
Publisher:
Our Price

250.00

Product Highlights

नेब्रास्कातील पोलीस अधिकारी आणि मुलांची घटस्फोटित माता कॅथरीन बोल्कोव्हॅक खासगी लष्करी कंत्राटदार डीनकॉर्प इंटरनॅशनल या कंपनीची नोकरभरतीची जाहिरात बघते, अर्ज करते आणि भरती होते. चांगली कमाई, जगभर प्रवास आणि युद्धामुळे छिन्नभिन्न झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्याची संधी म्हणजे तिच्यासाठी उत्कृष्ट संधी असते. लवकरच ती बोस्नियात पोहोचते. युनोच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या कामगिरीत मदत करण्यासाठी डीनकॉर्पला कंत्राट दिले जाते. तिच्याकडे मानवी हक्क अन्वेषक आणि लिंगविषयक विभागाची प्रमुख म्हणून काम सोपवण्यात येते. योग्य असे प्रशिक्षण दिले गेले नसल्याने तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते; परंतु साराजेव्होत आल्यानंतर तिला कल्पना नव्हती, इतक्या वाईट गोष्टींचा ती छडा लावते. जीव धोक्यात घालून कॅथी अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध घेऊ लागते. खासगी भाडोत्री सैनिकांच्या कंत्राटदाराबरोबर, युनो व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटेलोटे असणाऱ्या मानवी व्यापारात गुंतलेल्या महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्याची बिंगे ती फोडते. लवकरच तिची पदावनती करून तिला नोकरीवरून बडतर्फ केले जाते. जिवे मारले जाण्याच्या भीतीने ती बोस्निया सोडते. गोळा केलेले सर्व पुरावे सतत जवळ बाळगून ठेवल्यामुळे डीनकॉर्पविरुद्ध दाखल केलेला खटला ती जिंकते. डीनकॉर्पची काळी कृत्ये उजेडात आणण्यात यशस्वी होते. इथे दुसऱ्या देशात खेळवल्या जाणाऱ्या युद्धाच्या मुळाशी असणारे धोके ओळखून कॅथी सावध राहण्याचा इशारा देत आहे. रक्षण आणि गुलामीसदृश आयुष्य कंठणाऱ्याची शांतता काळात सुटका करण्याच्या जबाबदारीची ती जाणीव करून देते. तुलना होऊ न शकणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीबरोबर मुकाबला करताना आपल्या मनाची पकड घेणारी आणि चांगली कामे करण्यास उत्तेजन देऊन आश्चर्यचकित करणारी, धैर्य आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवणारी ही सत्य कहाणी. अन्यायाविरुद्ध उठणारा फक्त एक आवाज किती किमया करू शकतो, याचा प्रत्यय देते.

Quantity:
in stock
Category: