₹300.00
ही गोष्ट – एका प्राणिसंग्रहालयाची…त्यात राहणा-या प्राण्यांची… माणसांची… त्यांच्या नातेसंबंधांची! सहा वर्षे सखोल संशोधन करून थॉमस फ्रेंच यांनी लिहिलेल्या या आगळ्यावेगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला अविस्मरणीय अशी पात्रे भेटतील. कधी एखादा नर चिम्पांजी भेटेल, तर कधी परम्यूम्सची आवड असलेला वाघ भेटेल… तर कधी अत्यंत हुशार असे या संग्रहालयाचे सीईओ भेटतील! इतकेच नाही, तर ही गोष्ट तुमच्यासमोर अनेक निकडीचे प्रश्न उभे करेल : अस्तंगत होत चाललेल्या प्राण्यांच्या प्रजातींबाबत काय भूमिका घेतली पाहिजे? त्यांना वाचवण्यासाठी माणसाने काय केले पाहिजे? जंगलांवर पर्यायाने प्राणिजगतावर माणसाचे होत असलेले आक्रमण कसे थांबवले पाहिजे?..विशेष म्हणजे अशा गंभीर मुद्द्यांविषयी बोलताना ही गोष्ट नीरस होत नाही, कारण त्यात हसू-आसू, हरवणे-गवसणे, सुख-दु:ख अशा भावभावनांचे विलक्षण नाट्य असल्याने ती आपल्याला खिळवून ठेवते.अशी ही एका प्राणिसंग्रहालयाची गोष्ट…निसर्गावर नियंत्रण ठेवू पाहणाNया मानवी हव्यासाची… विचार करायला लावणारी…!