ZOMBADA – झोंबडं
₹195.00
Product Highlights
लोक घुपळ्या घुपळ्याने जमत होते… सभेत भाषण दिल्यागत तावातावाने बोलत होते..तासाभरातच तेथे तीन-चार हजारांचा जमाव जमला! कुणी हाकारे-कुकारे न घालता एक प्रकारच्या चिडीने लोक जमले होते… जमत होते…आणि मग हा मोर्चा निघाला… ‘रास्ता रोको’ हटाओ…‘निगवणी बचाओ!’‘आंदोलनाचा…’‘धिक्कार असो!’वैतागलेले नागरिकही या मोर्चात अधे-मधे रस्त्यात सामील होत होते व मोर्चाची लांबी आणखीन फुगीर करीत होते. हे मोर्चातील नागरिक व संग्रामनगरातील शेतकरी आमनेसामने आले तर कदाचित अनावस्था प्रसंग ओढवेलही! कारण दोन्हीकडील लोक चिडलेत, खवळलेत! काय होईल सांगता येत नाही!
Description
PEOPLE WERE GATHERING IN GROUPS WHILE TALKING AT THE HIGHEST PITCH. WITHIN AN HOUR THE NUMBER CROSSED A THOUSAND THOUGH NO ONE HAD PARTICULARLY GIVEN A CALL. IT TURNED INTO A HUGE MARCH. “STOP THIS ‘ROAD-BLOCK’!” “SAVE NIGAVANI!” “SHAME ON AGITATION!” PEOPLE WERE FED UP AND HENCE WERE JOINING IN TO SHOW THEIR SUPPORT. THIS CONTINUOUSLY SWELLED UP THE SIZE OF THE MARCH. NOW, IF THE FARMERS FROM SANGRAM NAGAR AND THESE PEOPLE COME FACE TO FACE THEN SURELY THERE WOULD BE A GREATER TROUBLE. PEOPLE ON BOTH THE SIDES ARE EXTREMELY DISSATISFIED AND ANGRY. NO ONE CAN TELL THE END RESULT.
Brand
MAHADEO MORE
Birth Date : 22/06/1939
महादेव मोरे यांचा जन्म बेळगाव येथील निपाणी येथे झाला. त्यांचे एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढे इंटर आर्ट्सचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरला दाखल झाले, मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना १९५९ साली कॉलेज शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी घर चालवण्यासाठी अनेक अंगमेहनतीची कामेही केली. मात्र एकीकडे त्यांचे लिखाणही चालूच होते. यादरम्यान त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, प्रासंगिक लेख, दैनिकांच्या पुरवण्यांमधून सदर लेखन, समीक्षा लेखन असे विविधस्वरूपाचे लेखन केले. त्यांची पहिली कथा २२ ऑक्टोबर, १९५९ साली साप्ताहिक स्वराज्यमध्ये प्रकाशित झाली. नवयुग, किर्लोस्कर, गावकरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध कथास्पर्धांमध्येही त्यांच्या कथांना पारितोषिके मिळाली. आजवर त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या आणि ललित गद्य असे साहित्य प्रकाशित झाले आहे. चिताक या त्यांच्या कथासंग्रहास १९७५-७६ सालचा व चेहऱ्यामागचे चेहरे या संग्रहास राज्य पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. झोंबड या त्यांच्या कादंबरीस १९९० सालातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी म्हणून दोन पारितोषिकेही मिळाली. त्यांची थ्रील्स, बेंडल, तिंगाड आदी पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.
Reviews
There are no reviews yet.