ZATPAT VYAKTIMATVAVIKAS : SWAPARIVARTANACHE NAVIN TANTRA – झटपट व्यक्तिमत्वविकास : स्वपरिवर्तनाचे नवीन तंत्र
₹70.00
Product Highlights
आजचा जमाना हा ‘इन्स्टन्ट’चा जमाना आहे. येथे सर्व काही, अगदी यशसुद्धा इन्स्टन्ट हवे आहे. म्हणजेच झटपट हवे आहे; पण ते तसे मिळत नाही. कारण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. आणि इथे कोणालाही थांबायला वेळ नाही. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:मध्ये कोणते बदल करावेत व कसे करावेत हेही कित्येकांना माहीत नाही. हे बदलही आपल्याला झटपट हवे असतात. ह्या पुस्तकातील सूचना अमलात आणल्यात, तर कमीतकमी दिवसात तुम्ही स्वत:मध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडवून विजयश्री स्वत:कडे खेचून आणू शकता.
Description
EVERYONE LIKES TO BE A WINNER IN THIS COMPETITIVE WORLD. PEOPLE WANT NAME, FAME, MONEY OR SUCCESS QUICKLY. EVERYONE IS IN A HURRY. EVERYONE WANTS IT INSTANTLY. FOR ACHIEVING SUCCESS, ONE IS REQUIRED TO ACQUIRE NEW SKILLS & HABITS. MANY PEOPLE DO NOT KNOW ABOUT NEW SKILLS AND HABITS. THEY SHOULD KNOW THAT. NOONE HAS PATIENCE TO LEARN THESE NEW SKILLS. EACH ONE WANTS IT INSTANTLY. THIS BOOK WILL HELP YOU DISCOVER NEW SKILLS & HABITS WHICH ARE REQUIRED FOR SUCCESS INSTANTLY & LEARN THEM INSTANTLY.
Brand
SANJEEV PARALIKAR
Birth Date : 30/11/1901
वर्तन शैली, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास ह्यांसारख्या विषयांवर अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. आठ हजारांहून अधिक लोकांनी त्यांच्या कार्यशाळेचा फायदा घेतलेला आहे. आज संजीव परळीकर हे इनोव्ह सोर्स सोल्युशन ह्या कंपनीमध्ये एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आहेत. तत्पूर्वी नऊ वर्षे ते जीटीएल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये ट्रेनिंग विभागात, ला\नग अॅन्ड डेव्हलपमेंटचे जनरल मॅनेजर ह्या हुद्यावर कार्यरत होते. त्याआधी ते युनायटेड कार्बन ह्या कंपनीत पर्सनल मॅनेजर ह्या हुद्यावर वर्षभर काम करत होते. त्याआधी दोन वर्षे ते निकोलस पिरामल ह्या कंपनीत एम्प्लॉई रिलेशन्स मॅनेजर या हुद्यावर होते. परंतु त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात हेक्स्ट इंडिया लिमिटेड ह्या औषध निर्मितीच्या कंपनीमध्ये जनरल वर्कर ह्या पदापासून केली. कंपनीत कामगार म्हणून काम करत असतानाच त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, कॉमर्सची पदवी मिळवली आणि सात वर्षांमध्ये कामगार ह्या पदावरून ऑफिसर ह्या पदापर्यंत बढती मिळवली. त्यानंतर पर्सनल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले व पुढच्या दहा वर्षांत असिस्टंट मॅनेजर ह्या पदापर्यंत त्यांची प्रगती झाली. परंतु त्यापुढे बढती मिळणे अशक्य झाल्यामुळे सतरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी निकोलस पिरामल ह्या कंपनीकडे आपला मोर्चा वळवला. लेखकाकडे गेल्या तीस वर्षांतील व्यावसायिक आयुष्यातले अनेक अनुभव आहेत, तेच त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.
Reviews
There are no reviews yet.