YUDDHA CORONASHI – युद्ध कोरोनाशी
₹350.00
Product Highlights
ऐतिहासिक काळापासून अनेक सूक्ष्मजीवांनी मानवजातीला नष्टतेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवल्याची उदाहरणे आहेत. जगभरात वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या साथींच्या आणि माणसांनं त्याविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या मन विषण्ण करणाऱ्या कहाण्या आहेत. त्यातून जगभरातल्या वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सामान्य माणसांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे अनेक आशेची किरणं दिसत आहेत. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे या विषयाची पुन्हा उजळणी करणं गरजेचं बनलं आहे. या विषयाला रोगाचा आणि औषधाचा वास असला तरी, आजच्या काळात हे बाळकडू देणं गरजेचं वाटल्यामुळे डॉ. अनिल गांधी यांनी या पुस्तकात या विषयाला हात घातलेला आहे. सोबतच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर, पर्यावरण वरण अभ्यासक डॉ. रविंद्र व्होरा यांच्यासारख्या मान्यवरांनी या विषयाचा विविधांगी आढावा घेतला आहे.
Description
FROM HISTORICAL TIMES, THERE HAVE BEEN INSTANCES WHERE MANY MICROORGANISMS HAVE BROUGHT MANKIND TO THE BRINK OF EXTINCTION. THERE ARE HEARTBREAKING STORIES OF EPIDEMICS AND HUMAN STRUGGLES SPREAD ACROSS THE WORLD AT DIFFERENT TIMES AND IN DIFFERENT PLACES. THERE ARE MANY GLIMMERS OF HOPE IN THE CONTRIBUTION OF SCIENTISTS, DOCTORS AND ORDINARY PEOPLE AROUND THE WORLD TO FIND A WAY OUT OF THIS CRISIS. THE GLOBAL CRISIS OF CORONA HAS NECESSITATED A RETHINK. DR. ANIL GANDHI HAS TOUCHED VARIOUS ASPECTS ON THIS SUBJECT IN THIS BOOK. BESIDES, EMINENT PERSONS LIKE FORMER IAS OFFICER AVINASH DHARMADHIKARI, PSYCHIATRIST DR. HAMID DABHOLKAR, ENVIRONMENTALIST RAVINDRA VORA HAVE GIVEN VARIOUS REVIEWS ON THIS SUBJECT.
Brand
ANIL GANDHI
डॉ. अनिल गांधी यांचा जन्म १९३९ मध्ये माढा (सोलापूर) येथे झाला. त्यांनी १९६३ला एम.बी.बी.एस. झाल्यानंतर पुण्यामध्ये फॅमिली फिजिशियन म्हणून पाच वर्षें प्रॅक्टिस केली. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरला. १९७१ला ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलमधून एम.एस. झाले. याच काळात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पेशंट्सवर उपचार करण्यासाठी त्यांना औषधांपासून ऑपरेशनपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ते १९६६ ते ८६ अशी वीस वर्षे खेड्यापाड्यांमध्ये जात होते. १९७०ला गांधी हॉस्पिटल सुरू झाले. तिथपासून आजपर्यंत त्यांनी हजारो ऑपरेशन्स केली; त्याद्वारे एक कुशल सर्जनअशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सेंट माक्र्स हॉस्पिटल, लंडन येथून १९७४ ला कोलोरेक्टल सर्जरीमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले. नंतर १९८४ पर्यंत परदेशात अनेक ठिकाणी त्यांनी शोधनिबंध सादर केले. बी.जे. मेडिकल कॉलेज, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, धोंडूमामा साठे होमिओपॅथी कॉलेज येथे मानद प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. याचबरोबर सामाजिक कार्याच्या तळमळीतून त्यांनी लोणावळ्याजवळील पांगळोली या आदिवासी वस्तीत आरोग्य, शिक्षण व विकासकार्य सुरू केले. पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय एकात्मता अभियानात त्यांचा मनापासून सहभाग होता. २०११मध्ये पुणे व वाई येथील वसंत व्याख्यानमालेत व्याख्याने. मना सर्जना या आत्मकथनपर लेखनाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद. दै. महाराष्ट्र टाइम्सच्या सगुण-निर्गुण या सदरात लेखमाला प्रसिद्ध. तसेच सकाळ, साप्ताहिक सकाळ आणि लोकसत्ता यातून विविध लेख. मनासर्जना (आत्मवृत्त) या पुस्तकाला बडोदा साहित्य परिषदेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले. या पुस्तकाचे गुजराथी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद झाले. धन्वंतरी घरोघरी, विचारी मना, शोध मनाचा, संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची या पुस्तकाचा उल्लेखनीय पुस्तक म्हणून विज्ञान परिषद मुंबईने गौरविले. या कातरवेळी – आनंदी वृद्धत्वाकडे वाटचाल आणि त्याचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर एकाचवेळी प्रसिद्ध झाले. कालनिर्णय आरोग्य २०१७ मध्ये संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची प्रदिर्घ लेख छापून आला आहे.

Reviews
There are no reviews yet.