YASHACHA KANMANTRA – यशाचा कानमंत्र
₹120.00
Product Highlights
या पुस्तकात लेखकांनी यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणाया विविध घटकांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. ते म्हणतात, ‘‘एकदा का तुमच्या हाती आत्मविश्वासाचा जादूचा दिवा आला, की बस्स! तुम्ही मनात इच्छा करायचाच अवकाश, की तुमची ती इच्छा पूर्ण झालीच, म्हणून समजा!’’ मात्र मनात ती इच्छा रुजवण्याचं देखील एक तक तंत्र आहे; आणि तेच या पुस्तकात लेखकांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तुमच्या यशाच्या आड येणारे सगळे अडथळे कसे दूर सारायचे, हे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत या पुस्तकात सांगितलेलं आहे… त्यामुळं पौगंडावस्थेत पदार्पण करणाया प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवं.
Description
IN THIS BOOK, THE AUTHOR DISCUSSES THE VARIOUS ASPECTS CONCERNED WITH BEING SUCCESSFUL. HE SAYS, `ONCE YOU FIND THE MAGIC LAMP OF CONFIDENCE THEN YOU SURELY WILL ACHIEVE EVERY SINGLE THING SET IN YOUR MIND. YOU JUST HAVE TO THINK ABOUT THE THING AND IT WILL BE YOURS!` BUT THERE IS A SPECIFIC WAY OF SOWING THE SEEDS OF CONFIDENCE IN YOUR MIND. THE AUTHOR HAS DISCUSSED THE SAME IN DETAIL IN THIS BOOK. HE DESCRIBES IN A VERY SIMPLE LANGUAGE THE VARIOUS WAYS TO CROSS ALL THE OBSTACLES IN THE PATH OF YOUR SUCCESS. EVERYONE, AT THE STAGE OF ADOLESCENCE SHOULD READ THIS BOOK.
Brand
ANANT PAI
Birth Date : 17/09/1929
Death Date : 24/02/2011
अनंत पै यांचा जन्म कर्नाटक येथे झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र हरवले. बाराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबई येथे आले. प्रकाशन आणि चित्रकथांचे वेड असलेल्या अनंत पै यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पुस्तक विभागात कनिष्ठ अधिकारी म्हणून काम केले. मुलांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयी असलेल्या अज्ञानाने व्यथित होऊन या विषयांवर आधारित चित्रकथा काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला. भारतीय लोककथा, पौराणिक कथा, इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे असलेल्या अमर चित्र कथा भारतीय चित्रकथांमध्ये एक मैलाचा दगड ठरल्या. या मालिकेतील ४४० पुस्तकांच्या ८६ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. १९६९ मध्ये अनंत पै यांनी रंगरेखा फिचर्स नावाची, चित्रकथा व हास्यचित्रांसाठीची संस्था स्थापन केली. टिंकल या लहान मुलांसाठीच्या नियतकालिकाची सुरुवातही त्यांनीच केली. पै यांनी लहान मुले व तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. १९९४ : उत्तर प्रदेश बालकल्याण संस्थानाचा कर्पूरचंद पुरस्कार. १९९६ : हैद्राबादमध्ये युद्धवीर स्मृती पुरस्कार. : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार. १९९७ : मणिपाल येथील डॉ. पै स्मृती पुरस्कार. २००० : इलिनॉइस, युएसए येथे मिलेनिअम कोकणी संमेलन पुरस्कार २००१ : राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउण्डेशनचा पुरस्कार. २००२ : प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार. २००३ : विश्व सारस्वत सन्मान.
Reviews
There are no reviews yet.