WARREN BUFFET – वॉरन बफे
₹230.00
Product Highlights
गुंतवणूक तसंच शेअरबाजार यांच्यात रस असलेल्या माणसाला ‘वॉरन बफे ’ हे नाव माहीत नसणे, हे केवळ अशक्य आहे. गेली कित्येक दशक बफेनं गुंतवणुकीच्या विश्वात मिळवलेलं यश अफाट आहे. शेअरबाजाराच्या चढ-उतारांवर सातत्यानं मात करून प्रचंड वेगानं त्यानं आपल्या वैयक्तिक संपत्तीत तर भर घातलीच आहे; पण शिवाय आपल्या ‘बर्वशायर हॅथवे’ या कंपनीमधल्या शेअरधारकांनाही कोट्यधीश केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतके पैसे कमावणा-या आणि जागतिक पातळीवरच्या सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचलेल्या या माणसाला पैशांचा उपभोग घेण्यामध्ये अजिबात रस नाही. त्याचं राहणीमान अत्यंत साधं आहे आणि पैसे विनाकारण खर्च करण्याचा त्याला साफ तिटकारा आहे. अतिशय काटकसरी वृत्तीनं राहणा-या बफेनं आपली जवळपास सगळी संपत्ती सामाजिक कामांसाठी खर्च करण्याचं जाहीर करून सगळ्या जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आपल्या कारकिर्दीत कधीही नीतिमत्ता सोडून न वागलेल्या बफेचं माणूस म्हणून महत्त्व याचसाठी खूपच जास्त आहे. अशा या विलक्षण माणसाच्या अफाट आयुष्याची आणि त्याच्या गुंतवणुकीच्या रहस्यांचा उलगडा करणारी ही सफर!
Description
EVERYONE IS CURIOUS TO KNOW MORE ABOUT THE GREATEST INVESTOR OF THIS ERA; WARREN BUFFETT. HE HAS NEVER TAKEN UP A JOB OR HAS NOT ESTABLISHED ANY BUSINESS. YET, HE IS ONE OF THE VERY FEW RICHEST PEOPLE OF THIS WORLD. WHAT MAKES IT A MIRACLE IS THE FACT THAT HE HAS NOT OPTED FOR ANY ILLEGAL WAY WHILE MAKING MONEY. EACH ONE OF US HAS A LOT TO LEARN FROM HIM. HIS EXCLUSIVE VISION COMBINED WITH A WITTY MIND WILL SURELY BE HELPFUL TO ONE AND ALL; THE ENTREPRENEURS, THE PROFESSIONALS, THE EMPLOYEES AND PEOPLE WHO WORK-FROM-HOME. THIS BOOK IS A COMPILATION OF FIFTY OF WARREN BUFFET’S FAMOUS QUOTES EXPLAINED IN A SIMPLE LANGUAGE.
Brand
ATUL KAHATE
Birth Date : 07/04/1973
१. एमबीए पदवीधर २. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १६ वर्षे अनुभव सिंटेल, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉयचे बँक, लार्सन अँड टुब्रो, इन्फोटेक या कंपन्यांनंतर आता ओरॅकल फिनॉन्शियल सर्विसेस सॉफ्टवेअरमध्ये तंत्रज्ञान प्रमुख ३. टाटा मॅकग्रॉ-हिल आणि पियरसनतर्फे भारतात आणि जगभरही वापरली जाणारी कॉम्प्युटरविषयीची २० पाठ्यपुस्तके, काहींच्या आंतरराष्ट्रीय आवृत्त्या आणि चिनी भाषेत अनुवाद ४. मराठीमध्ये आयटीतच जायचंय, कहाणी फ्ल्यूची, गुलाम, बोर्डरूम, चची भाषा, महामंदीच्या उंबरठ्यावर ही याआधीची पुस्तके ५. क्रिकेटवर मुश्ताक अली आणि महाराष्ट्र इन रणजी ट्रॉफी ही पुस्तके ६. वयाच्या १२व्या वर्षापासून वर्तमानपत्रांमध्ये क्रिकेट विषयी लेखन ७. लोकसत्ता, लोकप्रभा, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, साप्ताहिक सकाळ, लोकमत, साधना, केसरी, तरुण भारत, सामना अशा मराठी वृत्तपत्रांमधून/मासिकांमधून ४०००पेक्षा जास्त लेख प्रकाशित, कहाणी इंटरनेटची, तंत्रमंत्र, कहाणी बिनतारी संदेशवहनाची, बखर संगणकाची, वैद्यकायन, विज्ञानवाद, क्रिकेटच्या नियमांमधल्या गमतीजमती, क्रिकेट गमती, प्राणिजगत, क्रिकेटनामा इत्यादी सदरे प्रकाशित ८. क्रिकइन्फो, क्रिकेट अर्काइव्ह आणि इंडिक थ्रेड्स या वेबसाइट्सवर अनेक लेख प्रसिद्ध ९. दूरदर्शन (सह्याद्री चॅनेल), आयबीएन-लोकमत, स्टार माझा, साम या टीव्ही चॅनेल्सवर तंत्रज्ञानाविषयीचे अनेक कार्यक्रम १०. आयआयटी, सिम्बॉयोसिस, फग्र्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी, एमईटी इत्यादी अनेक ठिकाणी गेस्ट लेक्चरर ११. इंद्रधनू-महाराष्ट्र टाइम्स, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, इंदिरा एक्सलन्स अॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार प्राप्त

Reviews
There are no reviews yet.