VIRUS – व्हायरस
₹195.00
Product Highlights
त्याचं काय आहे प्रोफ्रेसर कॉम्प्युटरमध्ये एखाद दुसरा प्रोग्रॅमच काय,पण संपूर्ण सिस्टीमच करप्ट करणारा व्हायरस असतो. तसा हा एक व्हायरस! कॉम्प्युटरमध्ये तो बाहेरून घुसू शकतो किंवा काही वेळा कॉम्प्युटरच्या सिस्टिममध्येच दडलेला असतो आणि संधी मिळताच अक्टिव्हेट होतो. त्याला समूळ नष्ट करू शकेल असा एकही उपाय आजवर उपलब्ध झालेला नाही. अगदी तसंच आहे हे. फरक एवढाच, की हा व्हायरस बाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. किंबहुना त्यावरच ही सगळी सिस्टीम उभी आहे. मग ती चांगली कशी निपजणार?…तुम्ही कितीही नवे प्रोग्रॅम तयार करा… तुमच्या नकळत तो त्यात शिरतोच आणि सगळी सिस्टीम क्रॅश करून टाकतो.’
Description
EVERY FIELD OF LIFE IS AFFECTED BY POLITICS. EVEN FIELD LIKE EDUCATION IS NOT EXCEPTION FOR THAT. THIS VIRUS OF CORRUPTION & POLITICS NOT ONLY EXPLOITS THE TRUE PEOPLE IN THE FIELD, BUT CORRUPTS THE WHOLE SYSTEM. RAVINDRA THAKUR’S NOVEL ‘VIRUS’ PUTS LIGHT ON SUCH MALPRACTICES IN THE FIELD OF EDUCATION. ‘VIRUS’ EFFECTIVELY PORTRAY CHANGING SCENARIO OF THE EDUCATION SYSTEM.
Brand
RAVINDRA THAKUR
Birth Date : 14/04/1955
प्राध्यापक आणि माजी प्रमुख, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. कथा, कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा, संपादन, अनुवाद इत्यादी विविध स्वरूपाचे लेखन. आजपर्यंत सुमारे २५ ग्रंथ प्रकाशित. काही ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर… महात्मा या बहुचर्चित कादंबरीचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित. हिंदी अनुवाद प्रकाशनाधीन. म. फुले यांच्या जीवनचरित्रावरील क्रांति संगर या नाटकाचा हिंदी अनुवाद प्रकाशनाधीन. महात्मा या कादंबरीस रणजित देसाई, रा. तु. पाटील परखड हे पुरस्कार. दोन समीक्षा ग्रंथांना शिवाजी विद्यापीठाचे उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ पुरस्कार. शैक्षणिक आणि वाङ्मयीन कार्याबद्दल २००७ मध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार. अनेक विद्याथ्र्यांना एम.फिल. आणि पीएच.डी.साठी मार्गदर्शन. त्यांच्या साहित्यकृती आणि एकूणच साहित्यावर अनेक विद्यापीठांतून संशोधनकार्य सादर. म. फुले यांचे जीवनकार्य आणि इतर अनेक वाङ्मयीन विषयांवरील अभ्यासू व्याख्याते म्हणून प्रसिद्ध.
Reviews
There are no reviews yet.