VIRTUAL REALITY – व्हर्च्युअल रिॲलिटी
₹240.00
Product Highlights
” विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आज होत असलेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळं एकविसाव्या शतकातील जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्या जोडीला असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि बाजारपेठांचा विस्तार यामुळं एक नव्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा आज रूढ होत आहे. त्यापोटी आपली जीवनशैली तसेच मूल्यव्यवस्था तळापासून ढवळून निघत आहे. त्यांच्यात होत असलेल्या आमूलाठा बदलाचा कॅनव्हास डॉ. बाळ फोंडके यांच्या या कथांना लाभलेला आहे. कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सांस्कृतिक वातावरण असं झंझावातात सापडल्यावर त्याच कुटुंबाचा, समाजाचा, संस्कृतीचा घटक असणार्या वैज्ञानिकाचं व्यावसायिक आयुष्यही झपाटल्यावाचून राहत नाही. त्याच चक्रावर्ताचं प्रतिबिंब या कथांमध्ये पडलेलं आहे. विज्ञानातील नवनव्या आविष्कारांची सांगड राजकारण, अर्थकारण, व्यापारी स्पर्धा यांच्याशी घातली गेली की, त्यातून तयार होणारं विलक्षण मिश्रण माणसांचे विविध स्तरांवरचे परस्परसंबंध, त्यांचं भावजीवन, त्यांची जिद्द, अहंभाव, मत्सर आणि महत्त्वाकांक्षा, प्रसिद्धीची झिंग आणि पैशाचा लोभ यांनाही व्यापून टाकते. षड्रिपुंचे तांडव सुरू होते. विज्ञानाच्या घोडदौडीपायी अस्तित्वात येत असलेल्या, या बीभत्स वास्तवाची भेदक अनुभूती देणार्या या कथा `व्हर्च्युअल रिअॅलिटी`च्या गूढरम्य प्रांगणात नेऊन सोडतात, स्थल आणि काल यांना छेद देणार्या पाचव्या डायमेन्शनमध्ये घेऊन जातात. “
Description
THE REVOLUTIONARY DISCOVERIES IN SCIENCE AND TECHNOLOGY, IN PARTICULAR BIOTECHNOLOGY AND INFORMATION TECHNOLOGY IMPACT IN A MAJOR WAY LIFE OF HUMAN BEINGS IN THE TWENTY-FIRST CENTURY. THIS HAS ALSO LED TO CUT THROAT COMPETITION IN ALMOST ALL WALKS OF LIFE. NOT ONLY HAS LIFESTYLE UNDERGONE UNPRECEDENTED TRANSFORMATION BUT ALSO THE VALUE SYSTEM. FAMILY STRUCTURE, SOCIAL FABRIC, CULTURAL FOUNDATIONS HAVE ALL BEEN CAUGHT IN A MAELSTROM. THIS DOES NOT LEAVE ANY MEMBER OF SOCIETY ALONE, NOT EVEN THE SCIENTISTS THEMSELVES. THEIR PERSONAL AND MORE IMPORTANTLY THE PROFESSIONAL LIFE ARE GREATLY AFFECTED TAKING THEM INTO MINDBOGGLING VIRTUAL REALITY. THAT IS THE BASIC THEME OF ALL THE STORIES IN THIS ANTHOLOGY.
Brand
DR.BAL PHONDKE
Birth Date : 22/04/1939
डॉ. गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, विज्ञानविषयक सदरे, लेख, कथा, पुस्तके आणि शोधनिबंधांचे लेखक आहेत. १९६० साली आण्विक भौतिकी विषयात मुंबई विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर २३ वर्षे मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रातील जीव-वैद्यकीय विभागात व्यावसायिक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र ही त्यांची संशोधनाची क्षेत्रे होती. १९६७ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी विषयाची डॉक्टरेट मिळाली. १९६५-६७ व पुन्हा १९७४ मध्ये लंडनमधील चेस्टर बिट्टी इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च येथे अभ्यागत शास्त्रज्ञ म्हणून काम केले. १९७६-७७ मध्ये अमेरिकेतील कॅन्सस विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील पॅथॉलॉजी विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. विविध विषयांचे व्यासंगी लेखक म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वत:चे वेगळे ठळक स्थान निर्माण केले आहे. त्यांनी लिहिलेले लेख नियतकालिके, मासिके आणि वर्तमानपत्रांमधून नेहमी प्रसिद्ध होत असतात. उद्याचे वैद्यक, चिरंजीव आणि कॉम्प्युटरच्या करामती या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुक्रमे १९८९, १९९० आणि १९९२ सालचे पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञान विषय लोकप्रिय करण्यासाठीचे इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीचे इंदिरा गांधी पारितोषिकही १९९२ साली त्यांना मिळाले. इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन्सचे संचालक आणि प्रमुख संपादक म्हणून १९८९ पासून ते कार्यरत होते. सायन्स रिपोर्टर या मासिकाचे संपूर्ण स्वरूप बदलून ते अधिक आकर्षक, वाचनीय करण्यात डॉ. फोंडके यांच्या संपादन कौशल्याचा मोठा वाटा आहे. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे सध्याचे आकर्षक स्वरूप ही त्यांचीच कामगिरी आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या १९९८ च्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Reviews
There are no reviews yet.