VIDYAN NAVALAI (6 BOOKS) (ANTARAL, APLEPURVAJ, BHUGOL, KHAGOL,PASHU-PAKASHI ANI PRANIJAGAT) – विज्ञान नवलाई अंतराळ
₹390.00
Product Highlights
एका उडत्या बोटीनं एका सागरी विमानाला आकाशात नेल होत. आवाजाच्या वेगापेक्षा आपण जास्त वेगाने उड्डाण करू शकतो. हौशी लोकांच्या रॉकेट बनवायच्या स्पर्धा असतात. सॅटर्न ५ या रॉकेटची उंची तीन मजली इमारतीइतकी होती. अंतराळात जवळजवळ दोन लाख टाकाऊ पदार्थांचा कचरा आहे. विश्वास नाही ना बसत? हीच तर विद्यानाची नवलाई आहे. अशा कितीतरी आश्चर्यजनक गोष्टींचा हा नजराणा म्हणजे वैज्ञानिक अलिबाबाची अदभूत गुहांच! आणि ती उघडण्यासाठी कोणाच्याही मंत्राची आवश्यकता नाही. फक्त हि पान उलटा आणि हवी तितकी रत्न लुटा.
Brand
DR.BAL PHONDKE
Birth Date : 22/04/1939
डॉ. गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, विज्ञानविषयक सदरे, लेख, कथा, पुस्तके आणि शोधनिबंधांचे लेखक आहेत. १९६० साली आण्विक भौतिकी विषयात मुंबई विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर २३ वर्षे मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रातील जीव-वैद्यकीय विभागात व्यावसायिक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र ही त्यांची संशोधनाची क्षेत्रे होती. १९६७ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी विषयाची डॉक्टरेट मिळाली. १९६५-६७ व पुन्हा १९७४ मध्ये लंडनमधील चेस्टर बिट्टी इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च येथे अभ्यागत शास्त्रज्ञ म्हणून काम केले. १९७६-७७ मध्ये अमेरिकेतील कॅन्सस विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील पॅथॉलॉजी विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. विविध विषयांचे व्यासंगी लेखक म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वत:चे वेगळे ठळक स्थान निर्माण केले आहे. त्यांनी लिहिलेले लेख नियतकालिके, मासिके आणि वर्तमानपत्रांमधून नेहमी प्रसिद्ध होत असतात. उद्याचे वैद्यक, चिरंजीव आणि कॉम्प्युटरच्या करामती या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुक्रमे १९८९, १९९० आणि १९९२ सालचे पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञान विषय लोकप्रिय करण्यासाठीचे इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीचे इंदिरा गांधी पारितोषिकही १९९२ साली त्यांना मिळाले. इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन्सचे संचालक आणि प्रमुख संपादक म्हणून १९८९ पासून ते कार्यरत होते. सायन्स रिपोर्टर या मासिकाचे संपूर्ण स्वरूप बदलून ते अधिक आकर्षक, वाचनीय करण्यात डॉ. फोंडके यांच्या संपादन कौशल्याचा मोठा वाटा आहे. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे सध्याचे आकर्षक स्वरूप ही त्यांचीच कामगिरी आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या १९९८ च्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Reviews
There are no reviews yet.