VIDNYAN GAMATI – विज्ञान गमती
₹80.00
Product Highlights
विज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणे हा या पुस्तकाचा हेतू आहे. या पुस्तकातले प्रयोग लहान मुलांना करता येतील असेच आहेत. त्यांतल्या उपकरणांसाठी कुठल्याही प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही. ती घरातच सापडतील. यांतले प्रयोग अतिशय सोपे आहेत. विज्ञानातले मूलभूत नियम समजून घेण्यासाठी यांचा उपयोग होईल.
Description
THE MAIN CONCEPT BEHIND THIS BOOK IS TO CREATE AWARENESS ABOUT SCIENCE, TO MAKE EVERYONE CURIOUS ABOUT SCIENCE. THE PRACTICALS SUGGESTED IN THIS BOOK ARE VERY SIMPLE AND CAN BE DONE BY THE KIDS. YOU NEED NOT BUY ANY SCIENTIFIC APPARATUS TO CONDUCT THE EXPERIMENTS. ALL THESE CAN BE PERFORMED USING THE THINGS AVAILABLE IN ANY HOUSE. THE SIMPLE PRACTICALS HERE WILL BE HELPFUL TO UNDERSTAND THE BASIC PRINCIPLES OF SCIENCE.
Brand
ARUN MANDE
Birth Date : 14/10/1944
डॉ.अरुण विनायक मांडे हे अहमदनगर येथे स्थायिक असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ. अरुण मांडे यांना प्रदूषण या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९८९-९० व गुणसूत्र या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९९५-९६ मिऴाला आहे. एकांकिका लेखनासाठी नाट्यदर्पण प्रतिष्ठान पुरस्कार १९९२-९३ मिळाला आहे. विज्ञान गमती व विज्ञान जमती या पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार १९९४-९५, अमाणूस या विज्ञानकथा संग्रहाला स्व. मामा कडलक साहित्य पुरस्कार १९९८, पुणे विद्यापीठ चिपळूणकर विज्ञान पुरस्कार, आपट्याचं पान या कादंबरीला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील पुरस्कार २००८, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा कवी अनंत फंदी पुरस्कार २००८, अहमदनगर जिल्हा वाचनालय पुरस्कार २००९, पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार २००९, डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे व श्रीमती ऋतबाई हिवाळे पुरस्कार २००८-०९, अनघा प्रकाशन, ठाणे यांच्यातर्फे कादंबरी पुरस्कार २०१०. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा म.ना. गोगटे पुरस्कृत गो.रा. परांजपे वार्षिक ग्रंथकार पुरस्कार २०१०. वर्तमानपत्रात आरोग्यविषयक स्तंभलेखन. कथासंग्रह, कादंबरी आणि अनुवाद अशी मिळून एकंदर ४० पुस्तके प्रकाशित.
Reviews
There are no reviews yet.