VENDENTTA – व्हेण्डट्टा
₹240.00
Product Highlights
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इटलीतील नेपल्स शहराच्या पार्श्वभूमीवर सदर कथा घडते. उच्च श्रीमंत कुळात जन्मलेल्या कौंट पॅबिओ रोमानी आपल्या ‘रोमानी व्हिला’त राहत होता. स्त्रियांविषयी विशेष आकर्षण नसलेल्या उच्च विचार बाळगणारा असा कौंट रोमानी होता. त्याचा एक गिडो केरारी नावाचा जिवलग मित्र होता. पेशाने चित्रकार पण रंगेल असणारा फेरारी कौंट रोमानीला नेहमीच त्याच्या सज्जन सभ्य स्वभावावरून चिडवत असे. अशा मनाने निर्मळ असणाऱ्या कौंट रोमानीला एक मुलगी आवडते आणि तो तिच्याशी विवाह करतो. लग्नाला साधारण तीन वर्षे होतात आणि कौंट रोमानी एका अत्यंत गोंडस कन्येचा पिता झालेला असतो. आपली पत्नी नीना व मुलीसह कौंट रोमानी आनंदात जीवन जगत असताना नेपल्स शहरात कॉलराची साथ सुरू होते. एके दिवशी एका रोग्याला मदत करत असताना उन्हाच्या तडाख्याने त्याला भोवळ येते. टेकडीवर असणाऱ्या ‘रोमानी व्हिला’पासून दूर असणाऱ्या कौंट रोमानीला एक धर्मगुरू पाहतो. कॉलराच्या रुग्णांना मदत करणाऱ्या धर्मगुरूला वाटते की, या साथीनेच कौंट रोमानी याचा मृत्यू झाला असावा. असा समज झाल्याने धर्मगुरू कौंट रोमानीला शवपेटीत ठेवून त्याच्या खानदानी शवागारात त्याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याच्या बायकोला मृत्यूची वार्ता कळवतो. परंतु केवळ बेशुद्ध पडलेला रोमानी जागा होतो मोठ्या कष्टाने शवपेटीतून बाहेर पडतो. शवागारातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात एका खलाशी दरोडेखोराने त्याच्या शवागारात लपवलेला मोठा खजिना त्याला सापडतो. त्या खजिन्यातील सुंदर नेकलेस तो आपल्या प्रिय पत्नीला भेट देण्यासाठी घेतो दरोडेखोराने ज्या मार्गाने खजिना आत आणून लपवलेला असतो त्याच मार्गाने तो बाहेर पडून आपल्या घराकडे परततो. आपल्या मृत्यूने दु:खी झालेल्या आपल्या पत्नीला आपण स्वत: जाऊन आश्चर्यचकित करू असा विचार करत तो ‘रोमानी व्हिला’च्या बागेत येऊन पोहोचतो आणि त्याचवेळी आपल्या पत्नीला तो आपल्या जिवलग मित्राच्या गिडो फेरारीच्या बाहुपाशात बघतो. अतिशय दु:ख, तिरस्कार आणि सूडाच्या भावनेनं तो पेटून उठतो. संपत्तीच्या लालसेने वाहवत गेलेल्या व्यभिचारी पत्नीचे खरे रूप त्याला समजते आणि इथूनच सुरू होतो एका प्रामाणिक पतीचा सूडाचा प्रवास.
Reviews
There are no reviews yet.