VAYULAHARI – वायुलहरी
₹130.00
Product Highlights
‘‘…या लहरीपणामुळेच वारा अधिक आवडतो मला. तेजाचे सारे काम अगदी यंत्रासारखे, जलदेवी थोडीफार लहरी आहे खरी! पण अफाट समुद्रातील तिच्या लहरींतसुद्धा सीमा असतेच की! वायुलहरीचे तसे नाही. त्या आता कानगोष्टी करतील, तर आता कानशिलात लगावतील. वायुकुमार घटकेत जलदेवीच्या खेळण्यातील गुलाबदाणी आणून तिच्यातील सुवासिक शीतल तुषार अंगावर उडवील, तर दुसया घटकेला तेजाच्या हातातील ऊन पाण्याची झारी अंगावर ओतून चांगले चटकेही देईल. तुम्ही दार घट्ट लावून लेखनाला बसा अगर चार दिवसात एकान्तात गाठ न पडलेल्या पत्नीच्या गालावरील गुलाब का सुकले आहेत याचे पाच मिनिटात संशोधन करायला सुरुवात करा, तुमच्या बंदिस्त दरवाजाचे दार वाजू लागते. त्रासून तर दार उघडायला जावे तो काय! दार ठोठावून वाNयाची स्वारी केव्हाच निघून गेलेली असते…’’ कधी तरल, काव्यात्म होणारे, तर कधी टीका करणारे, कधी जीवनाविषयीचे चिंतन अभिव्यक्त करणारे – खांडेकरांचे अभिजात लघुनिबंध.
Reviews
There are no reviews yet.