VASUDEVE NELA KRISHNA – वसुदेवे नेला कृष्ण
₹240.00
Product Highlights
‘विज्ञानकथा’ हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. नॅशनल बुक ट्रस्टनं सर्व भारतीय भाषांमधील विज्ञानकथांचा एक संग्रह प्रकाशित केला आहे. ‘वसुदेवे नेला कृष्ण’ ही त्यांची कथा त्या संग्रहात समाविष्ट केलेली आहे. क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. ‘अभिहरण’मध्ये परग्रहवासियांच्या भेटीत अडकलेला नायक दिसतो, क्लोनिंगमुळे उडालेली गंमत ‘पिनी’मध्ये बघायला मिळते तर ‘वसुदेवे नेला कृष्ण’मध्ये अतिप्रगत विज्ञान-तंत्रज्ञानामुळे मिळणा-या सुखसोयी आणि त्यासोबतचं मानसिक दास्य नाकारून अपत्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यासाठी कष्ट व धोका पत्करणारे माता-पिता दिसतात. मानवी मूल्यं आणि मानवी भाव-भावना या सर्व कथांच्या केंद्रस्थानी आहेत.
Description
SCIENCE FICTION IS NO MORE A NOVEL TYPE IN MARATHI LITERATURE. MANY HAVE USED THIS FORMAT TO ENTERTAIN THE READERS. NOW THIS TYPE HAS GAINED SOME NAME AND FAME IN THE FIELD OF LITERATURE. THIS TYPE GIVES AN OPPORTUNITY TO THE INQUISITIVE HUMAN MIND TO TRY TO LOOK INTO THE FUTURE, TRY TO GIVE A DEFINITE FORM TO THE IDEAS THAT MIGHT COME TO BE TRUE IN THE FUTURE. THIS PEEPING INTO THE FUTURE IS NOT JUST ENTERTAINING, IT OFFERS A CHANCE TO REVEAL MANY A THINGS HIDDEN IN THE PAST AS WELL. SHUBHADA GOGATE IS NO MORE AN AMATEUR IN THIS FIELD. SHE HAS VERY SUCCESSFULLY TRIED HER HANDS ON SCIENCE FICTION IN THE FORM OF SHORT STORIES, LONG STORIES, AND NOVELS. MANY OF HER FICTIONS ARE AWARD WINNING. THE NATIONAL BOOK TRUST HAS PUBLISHED A COLLECTION OF SCIENCE FICTION WRITTEN IN VARIOUS INDIAN LANGUAGES. SHUBHADA`S FICTION VASUDEVE NELA KRISHNA HAS BEEN INCLUDED IN THAT. THIS BOOK CONTAINS THE FICTIONS BASED ON CLONING, ROBOT, AND TIME-JOURNEY.
Brand
SHUBHADA GOGATE
Birth Date : 02/09/1943
शुभदा गोगटे सुमारे पंचवीस वर्षे विविध साहित्य प्रसारांमध्ये विविध विषयांवर लेखन करीत आहेत. विज्ञान, इतिहास, गूढ, आरोग्य अशा अनेक विषयांमध्ये त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख इ. साहित्य प्रकाशित झालेले आहे आणि मान्यता मिळवून गेलेले आहे. यंत्रायणी या त्यांच्या पहिल्याच विज्ञानकादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट विज्ञान काल्पनिकेचा १९८३ चा पुरस्कार प्राप्त झाला होता. नॅशनल बुक ट्रस्टने सर्व भारतीय भाषांमधील उत्तम विज्ञानकथांच्या इंग्रजी भाषांतराचे संकलन प्रसिध्द केले; त्यात त्यांची वसुदेवे नेला कृष्ण ही गाजलेली कथा समाविष्ट केलेली आहे. भारतीय रेल्वेच्या पार्श्वभूमीवर असलेल्या त्यांच्या खंड्याळ्याच्या घाटासाठी या ऐतिहासिक कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा आणि गो.नी. दांडेकर पुरस्कृत मृण्मयी पुरस्कार मिळाले. त्याचाच पुढचा भाग असलेली दुसरी कादंबरी सांधा बदलताना हिला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आरोग्य विषयक लेखनामध्ये त्यांचे हृदयविकार निवारण हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरले.
Reviews
There are no reviews yet.