VAIDNYANIK KHELNI – वैज्ञानिक खेळणी
₹90.00
Product Highlights
ज्या मुलांना काही तरी करावेसे वाटते; पण नक्की काय करावे, हे त्यांना किंवा त्यांच्या पालकांना सांगता येणार नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल व ही ‘वैज्ञानिक खेळणी’ तयार करता-करता त्यांमागील सिद्धान्तांचा संबोध स्पष्ट होईल…
Description
THERE ARE MANY CHILDREN WHO WANT TO DO SOMETHING, BUT MANY A TIMES IT BECOMES DIFFICULT FOR THE PARENTS AS WELL AS THE CHILDREN TO UNDERSTAND WHAT THIS SOMETHING IS. THEY ARE CONFUSED. THIS BOOK WILL BE AN EXCELLENT GUIDE FOR SUCH CHILDREN. THE SCIENTIFIC TOYS MENTIONED HERE AND DISCUSSED HERE ARE EASY TO MAKE. THEY WILL SOLVE THE PURPOSE OF ENTERTAINING YOUR CHILDREN AS WELL AS MAKING THEM UNDERSTAND THE REAL THEOREM BEHIND THE WORKING OF IT.
Brand
D.S.ITOKAR
Birth Date : 23/09/1945
डी.एस. इटोकर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या गावी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. चित्रकला, कार्यानुभव, कळसूत्री बाहुली नाट्य, पटकथा लेखन, कृती संशोधन अशा वेगवेगळ्या विषयांत त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या लोकसंख्या शिक्षण उपकरण आणि वैज्ञानिक उपकरण यांना जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रभावी चित्रकला अध्यापन, विज्ञान उपकरणांची निर्मिती, शैक्षणिक साधनांचे अध्यापनात महत्त्व अशा विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले आहे. जीवन-शिक्षण , शिक्षण संक्रमण , विज्ञान युग , प्रगत विज्ञान अशा विविध मासिकांमधून इटोकर यांनी लोकसंख्या शिक्षण, समाजोपयोगी उत्पादक कार्य, विज्ञान, चित्रकला, कार्यानुभव या विषयांवर भरपूर लिखाण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराबरोबरच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आपल्या आसपास सहज मिळणाऱ्या वस्तू वापरून खेळणी तयार करता करता लहान मुलांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांच्यातील सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल, अशी त्यांना खात्री आहे. हा दृष्टिकोन बाळगूनच त्यांनी वैज्ञानिक खेळणी, छंदातून विज्ञान, खेळणीच खेळणी ह्या पुस्तकांची निर्मिती केली.

Reviews
There are no reviews yet.