VADAL MATHA TE 1965 BHARAT-PAK YUDDHA – वादळ माथा ते १९६५ भारत -पाक युद्ध
₹395.00
Product Highlights
२० नोव्हेंबर, १९६२ला यशवंतराव चव्हाण भारताचे `संरक्षण मंत्रिपद` भूषविण्यासाठीच दिल्लीला गेले. `हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री` या शब्दांत मराठी जनतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रीला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. चीनविरुद्ध १९६२मधील युद्धातील पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचलित बंदुका, दारूगोळा व हे सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले. त्यामुळे १९६५च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये जे काही घडले आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला, यांची उत्तरे यामध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडींचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. ……. `यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार व जाणते रणनिती विचारवंत होते….` – पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (‘१९६५ : WAR INSIDE STORY’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात)
Brand
RAM PRADHAN
Birth Date : 27/06/1928
Death Date : 31/07/2020
१९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून काम करत असताना नवीन महाराष्ट्राच्या जडणघडण कार्यात सहभागी होण्याची संधी राम प्रधान यांना मिळाली. तसेच यशवंतरावजी संरक्षणमंत्री असताना भारतीय संरक्षण दलाची पुनर्रचना यासारख्या महत्त्वाच्या कार्यात त्यांनी भाग घेतला होता. १९६६ ते १९७७ या काळात त्यांनी जिनिव्हा येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. १९७२ ते १९७७ या काळात युनोमध्ये संचालक पदावर असताना अविकसित देशांना वाणिज्य व विकास क्षेत्रांमध्ये सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७७-१९८१ या काळात ते महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव आणि १९८२-१९८५मध्ये राज्याचे मुख्यसचिव होते. तद्नंतर १९८५-८६ साली त्यांनी भारताचे गृहसचिवपद सांभाळले. त्याच काळात पंजाब, आसाम व मिझोराम हे महत्त्वाचे करार त्यांनी केले. भारतीय प्रशासकीय सेवेत ३४ वर्षे सेवा करून ३० जून, १९८६ रोजी ते निवृत्त झाले. कर्तृत्वसंपन्न लोकसेवेबद्दल १९८७ च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना पद्मभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अरुणाचलचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले. १९९०-१९९२ या वर्षांत महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके : राजीव गांधींच्या सहवासात वादळ माथा शब्दांचे सामर्थ्य यशवंतराव चव्हाण यांची संसदेतील भाषणे (४ खंड) बंधनाचे ऋण पहिली फेरी? – १९६५ भारत-पाक युद्ध
Reviews
There are no reviews yet.