TURNING POINTS – टर्निंग पॉईंट्स
₹180.00
Product Highlights
चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या आवारातला नेहमीसारखाच एक दिवस. माझे ‘संकल्पना ते ध्येय’ ह्या विषयावरचे व्याख्यान संपले होते आणि ते एक ऐवजी दोन तास चालले होते. संशोधनाचे काम करत असणा-या काही विद्याथ्र्यांबरोबर मी दुपारचे जेवण घेतले आणि परत वर्गाकडे गेलो. संध्याकाळी माझ्या खोलीवर परत जात होतो, तेव्हा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो. ए. कलानिधी बरोबरच आले. ते म्हणाले की, ‘कोणी तरी फोनवरून दिवसभर तुमच्याशी तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.’ आणि खरोखरीच; मी खोलीत पाऊल टाकले, तर फोन वाजतच होता. मी फोन उचलला, तेव्हा पलीकडच्या व्यक्तीने सांगितले, ‘‘पंतप्रधानांना आपल्याशी बोलायचे आहे.’’ काही महिन्यांपूर्वी ‘भारत सरकारचा प्रमुख शास्त्रीय सल्लागार’ ह्या केंद्रीय मंत्रिपदाच्या समकक्ष जागेचा राजीनामा देऊन मी अध्यापनाच्या कामावर परत रुजू झालो होतो. आत्ता जेव्हा मी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी बोलत होतो, तेव्हा माझे आयुष्य एका अनपेक्षित बदलाच्या टप्प्यावर होते. ‘टर्निंग पॉइंट्स’मधील कलाम यांची अशक्य वाटणारी कथा, ‘विंग्ज ऑफ फायर’ जेथे संपते, तेथून पुढे सुरू होते. ह्या कथेत त्यांच्या कारकिर्दीतल्या आणि राष्ट्रपतिपदाच्या कालावधीतल्या कोणाला फारशा ठाऊक नसलेल्या, काही विवादास्पद घटनांबद्दलच्या अनेक बारीकसारीक गोष्टी प्रथमच समोर येतात. यातून एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग तर समजतेच; पण प्रयत्न केले, चिकाटी ठेवली आणि आत्मविश्वास असला, तर अनेक सिद्धी मिळवून, कौशल्ये आणि सामथ्र्ये मिळवून महान वारसा असलेला हा देश पुन्हा महान कसा होऊ शकेल, त्याची संकल्पनाही मिळते. सर्वांत विशेष म्हणजे, ही गाथा आहे एका व्यक्तीने स्वत: आणि इतरांना बरोबर घेऊन केलेल्या प्रवासाची – जो प्रवास भारताला २०२०पर्यंत आणि नंतरही एक ‘विकसित राष्ट्र’ म्हणून उभे करेल.
Description
IT WAS LIKE ANY OTHER DAY ON THE ANNA UNIVERSITY CAMPUS IN CHENNAI. I HAD DELIVERED A LECTURE VISION TO MISSION AND THE SESSION GOT EXTENDED FROM ONE HOUR TO TWO. I HAD LUNCH WITH A GROUP OF RESEARCH STUDENTS AND WENT BACK TO CLASS. AS I WAS RETURNING TO MY ROOMS IN THE EVENING THE VICE- CHANCELLOR, PROF. A. KALANIDHI, FELL IN STEP WITH ME. SOMEONE HAD BEEN FRANTICALLY TRYING TO GET IN TOUCH WITH ME THROUGH THE DAY, HE SAID. INDEED, THE PHONE WAS RINGING WHEN I ENTERED THE ROOM. WHEN I ANSWERED, A VOICE AT THE OTHER END SAID, THE PRIME MINISTER WANTS TO TALK WITH YOU … SOME MONTHS EARLIER, I HAD LEFT MY POST AS PRINCIPAL SCIENTIFIC ADVISER TO THE GOVERNMENT OF INDIA, A CABINET-LEVEL POST, TO RETURN TO TEACHING. NOW, AS I SPOKE TO THE PM, ATAL BIHARI VAJPAYEE, MY LIFE WAS SET FOR AN UNEXPECTED CHANGE. TURNING POINTS TAKES UP THE INCREDIBLE KALAM STORY FROM WHERE WINGS OF FIRE LEFT OFF. IT BRINGS TOGETHER DETAILS FROM HIS CAREER AND PRESIDENCY THAT ARE NOT GENERALLY KNOWN AS HE SPEAKS OUT FOR THE FIRST TIME ON CERTAIN POINTS OF CONTROVERSY. IT OFFERS INSIGHT NOT ONLY INTO AN EXTRAORDINARY PERSONALITY BUT ALSO A VISION OF HOW A COUNTRY WITH A GREAT HERITAGE CAN BECOME GREAT IN ACCOMPLISHMENT, SKILLS AND ABILITIES THROUGH EFFORT, PERSEVERANCE AND CONFIDENCE. IT IS A CONTINUING SAGA, ABOVE ALL, OF A JOURNEY, INDIVIDUAL AND COLLECTIVE, THAT WILL TAKE INDIA TO 2020 AND BEYOND AS A DEVELOPED NATION.
Brand
A. P. J. ABDUL KALAM
Birth Date : 15/10/1931
Death Date : 27/07/2015
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, पद्यविभूषण व १९९८ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
Reviews
There are no reviews yet.