TO SIR, WITH LOVE – टू सर , विथ लव्ह
₹180.00
Product Highlights
मि. ब्रेथवेट, नवे शिक्षक. त्यांनी आपल्या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्याशी झटापट केली, प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली. हळूहळू त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आणि एक दिवस स्वत:च त्या मुलांवर निरतिशय प्रेम करू लागले. त्यांच्या वर्गातील गुंडगिरी करणारी, निर्ढावलेली मुलं त्यांना ‘सर’ म्हणून आदरानं हाक मारू लागली. त्या मुलांच्या गलिच्छ वस्तीतल्या पोरींना सन्मानानं ‘मिस्’ म्हणायलाही सरांनीच शिकवलं. त्या मुलांना हात स्वच्छ धुवायला शिकवलं आणि त्याचबरोबर शेक्सपिअरसुद्धा वाचायला शिकवलं. एका ध्येयानं प्रेरित झालेल्या शिक्षकानं रागाचं, द्वेषाचं, तिरस्काराचं रूपांतर प्रेमात केलं. पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रूपांतर आत्मविश्वासात केलं. दुस-यांच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा असतो, हे त्या मुलांना शिकवलं. हा त्यांचा विजय होता. एका शिक्षकाच्या तळमळीचा, विद्याथ्र्यांविषयी वाटणाऱ्या कळकळीचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रेमाचा…
Description
MR. BRAITHWAITE, THE NEW TEACHER. HE BEHAVED VERY DIFFERENTLY WITH THE STUDENTS IN HIS CLASS. HE MADE THEM LOOK DOWN SHAMEFULLY, REALIZING THEIR MISTAKES. HE FOUGHT WITH THEM, SOMETIMES HE ALSO WRESTLED WITH THEM. SLOWLY, YET STEADILY HE BROUGHT THE LIGHT OF KNOWLEDGE INTO THEIR LIVES AND LATER ON STARTED LOVING THEM, IMMENSELY. HIS STUDENTS WHO WERE FAMOUS FOR THEIR HOODLUMS, WHO WERE VERY SHAMELESS, STARTED RESPECTING HIM, CALLING HIM `SIR`. HE WAS THE ONE WHO TAUGHT THEM TO CALL THE GIRLS RESPECTFULLY WITH A `MISS`. HE TAUGHT THEM PERSONAL HYGIENE AND HE SAT WITH THEM TO READ SHAKESPEARE. HE WAS A TEACHER WITH SOME DEFINITE AIM, A TARGET. HE CHANGED THE HATRED, ANGER AND CONTEMPT INTO LOVE. HE TRANSFORMED THE REVOLUTIONARY NATURE OF THESE TEENAGERS INTO CONFIDENT MINDS. HE OPENED THE WAYS TO THINK ABOUT OTHERS, FROM OTHER`S POINT OF VIEWS. THIS WAS HIS SUCCESS, OF A TEACHER, OF HIS FERVOR, OF HIS EARNESTNESS TOWARDS HIS STUDENTS AND OF `THEIR` LOVE.
Brand
E.R. BRAITHWAITE
Birth Date : 27/06/1920
जॉर्जटाऊन, गयाना येथे जन्मलेले कादंबरीकार, लेखक आणि शिक्षक असलेले इ.आर. ब्रेथवेट कृष्णवर्णीयांबद्दलचे वांशिकभेद आणि सामाजिक स्थिती यांवरील कथांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. शैक्षणिक गुणवत्ता आणि क्षमता असतानाही दुसऱ्या महायुद्धानंतर अन्य वांशिक अल्पसंख्यांकांप्रमाणे इ.आर. ब्रेथवेट यांनाही त्यांच्या क्षेत्रातले काम मिळू शकले नाही. त्यांना लंडनमध्ये शालेय शिक्षकाची नोकरी पत्करावी लागली. टु सर विथ लव्ह हे पुस्तक या शिक्षकी पेशातून आलेले अनुभवांचे बोल आहेत. पुस्तके लिहिताना ते सामाजिक कार्याकडे वळाले. कृष्णवर्णीय मुलांचा सांभाळ करण्यासाठी ते काम करू लागले. त्यातूनच पेड सव्र्हंट या कादंबरीचा उदय झाला. टु सर विथ लव्ह या पुस्तकावर १९६७ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांचे काम चालू आहेच. आत्तापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Reviews
There are no reviews yet.