THIKARI – ठिकरी
₹80.00
Product Highlights
सोना… वपुंच्या कादंबरीची कथानायिका. तिला प्रथम प्रश्न पडला होता की, आपण ठिकरी खेळणाऱ्या आहोत की स्वत:च ठिकरी आहोत हा संभ्रम जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत काय करायचं? नव्या अनोळखी चौकोनात जाऊन पडण्यापेक्षा परिचयाचा जुना चौकोन काय वाईट! तिची स्वत:ची जरी अधूनमधून तगमग होत असली तरी इतर ठिकऱ्यांना ती ऊब देऊ शकत होती. त्यांच्यापैकी कुणीतरी जेव्हा वाट्याला आलेला चौकोन सोडायचा प्रयत्न करेल, तेव्हा ती ठिकरी योग्य चौकोनात पडणार आहे की नाही, हे ती दक्षतेने पाहणार आहे.
Description
ALL THE STORIES THAT ARE COMPILED UNDER THIS TITLE ARE ACTUALLY THE PRODUCT OF 1970S. TODAY, ONE MIGHT CONSIDER MANY OF THE IDEAS AS A FANCY, LIKE THE POLICE BLOWING HIS WHISTLE THE MOMENT HE SAW A GIRL AND A BOY IN A COLLEGE TALKING TOGETHER OR THE RATE AT WHICH BEER WAS AVAILABLE WITH THE IRANI, ETC. THOSE WERE THE DAYS WHEN Rs. 10 WERE MORE THAN ENOUGH TO FULFILL ALL THE DEMANDS OF A TEENAGER. ONE WILL ENJOY THESE STORIES MORE BY BEING CONSIDERATE ABOUT THE STYLES AND PRICES DURING THE LAST CENTURY. ALL THE STORIES WHICH ARE PRINTED UNDER THIS TITLE WERE PREVIOUSLY PUBLISHED IN THE MONTHLY MARATHI MAGAZINES LIKE ‘BUVA’ AND ‘VATVAT’ WHICH WERE VERY FAVOURITE AMONG ALL. TODAY, AFTER A PERIOD OF ALMOST HALF CENTURY, THESE HAVEN’T LOST THEIR FRAGRANCE AND THE ABILITY TO MAKE ONE ENJOY THEM. ONE MIGHT NOT FIND THEM TO BE HIGHLY HUMOROUS, BUT THEY SURE ARE ABLE TO PINCH THE LIGHTER VEIN OF THE MIND.
Brand
V.P.KALE
Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/03/2001
लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१… आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार..
Reviews
There are no reviews yet.